संजय राऊत यांचे सूचक ट्वीट; “गमावण्यासारखं काही नसतं तेव्हा कमवण्यासारखं खूप काही असतं”

105

महाविकास आघाडी सरकारमध्ये खाद्यांला खांदा लावून सत्तेवर असणा-या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उतरती कळा लागली आहे. अशात विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना असा दावा शिंदे गटाने केला असल्याने, ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्ह जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. गमावण्यासारखं काही नसतं तेव्हा कमवण्यासारखं खूप काही असतं, जय महाराष्ट्र असे ट्वीट  त्यांनी केले आहे.

( हेही वाचा: ‘इगोपेक्षा कार्यकर्त्यांच्या भावना महत्वाच्या, अजूनही वेळ गेलेली नाही!’, शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आवाहन)

संजय राऊत यांनी केलेले ट्वीट

जब खोने के लिए कुछ भी ना बचा हो तो पाने के लिए बहुत कुछ होता है, जय महाराष्ट्र, असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती व धनुष्यबाण चिन्हाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. जब खोने के लिए कुछ भी ना बचा हो तो पाने के लिए बहुत कुछ होता हे जय महाराष्ट्र, असे ट्वीट राऊतांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.