शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार फैसला?

158

राज्यात राजकारणात उलथापालथ घडवून आणणारा एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेतील उठाव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरण्यास भाग पडणारा ठरला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनवरचा दावा केला आहे. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी, २२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांची यावर फैसला होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठरणार मार्गदर्शक 

एकनाथ शिंदे यांच्या गटाने धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला आहे. त्याविरोधातही उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवरही याचिका दाखल केली आहे. शिंदे गटानेही आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली. अशा प्रकारे या सत्तासंघर्षामध्ये अनेक विषयावरील याचिका दाखल झाल्या आहेत. यावरील निर्णय अवघ्या देशात एक मार्गदर्शक निर्णय म्हणून पाहिला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग का बनलाय मृत्यूचा सापळा?)

काय म्हणतात उद्धव ठाकरे? 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सोमवारी होणाऱ्या निकालावर भाष्य केले आहे. न्यायालयात जे व्हायचे ते होईल. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. माझ्यासोबत जनतेच्या भावना जोडल्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसैनिक आज शपथपत्रे घेऊन मातोश्रीवर आले होते. यावेळी त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. या दललीतून बाहेर पडण्याची लोक वाट पाहत आहेत. या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निवडणुका घ्या म्हटल्या जात आहेत. मात्र निवडणूक घेण्याची यांच्यात हिंमत नाही, असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी चढवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.