Shivsena : शिवसेनेत असे कधी पाहिलंत का ? चक्क उद्धव, आदित्य आणि रश्मी ठाकरेंच्या स्वागतांचे फलक

ठाकरे कुटुंबांचे स्वागत करणारे फलक प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात झळकले असून शिवसैनिकांकडून आता ठाकरे कुटुंबांचे स्वागत करणारे बॅनर लावून एकप्रकारे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न सुरु आहे का, असा प्रश्न शिवसैनिकांनाच पडला आहे.

69
Shivsena : शिवसेनेत असे कधी पाहिलंत का ? चक्क उद्धव, आदित्य आणि रश्मी ठाकरेंच्या स्वागतांचे फलक
Shivsena : शिवसेनेत असे कधी पाहिलंत का ? चक्क उद्धव, आदित्य आणि रश्मी ठाकरेंच्या स्वागतांचे फलक

विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यात आजपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या पक्षाचे नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच रश्मी ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. (Shivsena) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या दुभाजकांवरील बेटांवर या हे स्वागताचे बॅनर झळकले गेले आहेत. विशेष म्हणजे अशाप्रकारे ठाकरे कुटुंबांचे स्वागत करणारे फलक प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात झळकले असून शिवसैनिकांकडून आता ठाकरे कुटुंबांचे स्वागत करणारे बॅनर लावून एकप्रकारे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न सुरु आहे का, असा प्रश्न शिवसैनिकांनाच पडला आहे. (Shivsena)

उबाठा शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा दादर शिवाजी महाराज मैदान परिसरात अर्थात शिवतिर्थावर होत असून या मेळाव्यासाठी राज्यातील विविध भागांमधून शिवसैनिक उध्दव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी आले आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यात आजवर विचारांचे सोने लुटण्यासाठी यावे, अशा प्रकारचे आवाहन करणारे बॅनर झळकत होते.  किंबहुना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकत होते, तिथे प्रथमच शिवतिर्थावरील परिसरात शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहे. (Shivsena)

उबाठा गटाच्या शिवसेनेचे धारावी, माहिम आणि वडाळा विधानसभेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे असलेल्या स्वागतांचे बॅनर लावले आहेत, तर माहिम विधानसभा संघटक राजू पाटणकर यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तसेच आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे स्वतंत्र बॅनर लावले आहेत. त्यामुळे विभागप्रमुख व विभाग संघटकांनी अशा प्रकारे लावले आहेत.

माहिम विभागाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उबाठा शिवसेनेने पुन्हा एकदा या विभागात आपली बांधणी सुरु केली आहे. त्यामुळेच या विभागात जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना शिवसेना या विभागात मजबूत असून अशा प्रकारे स्वागताचे बॅनर लावून सरवणकर यांना चपराक देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. (Shivsena)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.