Shiv Sena MLA Disqualification : उबाठाच्या महापत्रकार परिषदेत पुरावे, व्हिडिओ आणि बरेच काही…निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

Shiv Sena MLA Disqualification : 23 जानेवारी 2018 रोजी पुढील निवडणूक झाली. त्याचे पुरावे देखील अनिल परब यांनी दाखवले. त्याचा प्रस्तावही पत्रकार परिषदेत मांडला गेला. पक्ष घटना दुरूस्तीचे ठराव देखील दाखवले गेले. अ

169
Shiv Sena MLA Disqualification : उबाठाच्या महापत्रकार परिषदेत पुरावे, व्हिडिओ आणि बरेच काही...निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
Shiv Sena MLA Disqualification : उबाठाच्या महापत्रकार परिषदेत पुरावे, व्हिडिओ आणि बरेच काही...निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महापत्रकार परिषदेत धक्कादायक पुरावे सादर केले. ज्या ज्या मुद्यांचा आधार घेऊन राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतला. ते मुद्दे पुराव्यानिशी खोडण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी अधिवक्ता अनिल परब (Anil Parab) यांनी याविषयीचे पुरावे मांडले. (Shiv Sena MLA Disqualification)
या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे सर्व नेते, पदाधिकारी, ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब आदी नेते या बैठकीत उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. त्यानिकालावर ठाकरे गटाकडून आरोप करण्यात येत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना नेते म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नियुक्ती केली होती. याचा व्हिडिओ या पत्रकार परिषदेतून दाखवण्यात आला होता. त्यानंतर अनिल परब म्हणाले की, हे सर्व पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे दिले तरी देखील नार्वेकर म्हणतात की, माझ्याकडे निवडणूक आयोगाने जुनीच घटना दिली. त्या आधारे निकाल दिला आहे.

2018 च्या पक्ष घटना दुरूस्तीचे दाखवले पुरावे

23 जानेवारी 2018 रोजी पुढील निवडणूक झाली. त्याचे पुरावे देखील अनिल परब यांनी दाखवले. त्याचा प्रस्तावही पत्रकार परिषदेत मांडला गेला. पक्ष घटना दुरूस्तीचे ठराव देखील दाखवले गेले. अनिल देसाई यांनी तो घटना दुरुस्तीचा ठराव मांडला होता. त्याचा व्हिडिओ परब यांनी दाखवला. त्यात शिवसेना पक्षाअंतर्गत निवडणूकाची सविस्तर माहिती देणारा ठराव होता. शिवसेनापक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहे. निवडणूक आयोगाकडे त्याची नोंद कशी आहे. कारण आपण दिले म्हणूनच वेबसाईडवर आणि त्यांच्या रेकॉर्डवर आले आहे. सगळी कागदपत्रे देऊन देखील निवडणूक आयोग म्हणते की, अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाहीत. उद्धव ठाकरे यांना कोणतेही अधिकार नाहीत. असे सांगितले जाते. पण तसे काही नाही, सर्व अधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे, असे अनिल परब म्हणाले. बाळकृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली, ही सर्व कागदपत्रे मी राहुल नार्वेकर यांच्याकडे दिली होती. निवडणूक आयोगात देखील यासंदर्भात आम्ही माहिती दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने जे निकष लावले होते. त्याप्रमाणे निवडणूक घेतली गेली होती. अॅड. बाळकृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया झाली होती. निवडणूक आयोगाला सादर केलेले कागदपत्र माझ्याकडे आहेत, असे अनिल परब म्हणाले. (Shiv Sena MLA Disqualification)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.