Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप

आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड उद्धव ठाकरे यांनी केली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर यांनी ठाकरे गटावर केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ मध्ये शिवसेनेच्या पक्षघटनेत लोकशाहीला अभिप्रेत असा बदल केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी २०१३ मध्ये घटनेत पुन्हा बदल केला आणि २०१७ साली त्यांनी घटनेत बदल केल्याचे जाहीर केले.

167
Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप
Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप

शिवसेनेची १९९९ ची घटना अधिकृत असून २०१३ मध्ये करण्यात आलेली घटना दुरुस्ती पूर्णपणे अवैध आणि १०० टक्के लोकशाही विरोधी पद्धतीने करण्यात आल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्यामुळे आम्हीच बरोबर असून हा निर्णय कसा चुकीचा आहे, अशी ओरड करून जनतेची दिशाभूल करण्याचे आणि त्यांच्या मनात आमच्याबद्दल चुकीची भावना पसरवण्याचे काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या गटाचे लोक करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंगळवारी (१६ जानेवारी) केला. (Deepak Kesarkar)

आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरे गटावर केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ मध्ये शिवसेनेच्या पक्षघटनेत लोकशाहीला अभिप्रेत असा बदल केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) २०१३ मध्ये घटनेत पुन्हा बदल केला आणि २०१७ साली त्यांनी घटनेत बदल केल्याचे जाहीर केले. पण घटनेमध्ये बदल करताना घटनादुरुस्ती प्रक्रियेनुसार निवडणूक आयोगाची मंजुरी घ्यावी लागते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीकडे जावे लागते. तसेच आपल्या पक्षाची बैठक घेऊन त्यामध्ये घटनेत बदल केल्याचा प्रस्ताव पारित करावा लागतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडून घटना दुरुस्तीची मंजुरी घेतली नव्हती, असा दावा केसरकर यांनी केला. (Deepak Kesarkar)

पक्षातील एखाद्या प्रमुख व्यक्तीला पक्षातून काढण्याचा निर्णय फक्त पक्षप्रमुख घेऊ शकत नाही, तर तो संपूर्ण पक्षाचा निर्णय असावा लागतो. पक्षाची बैठक घेऊन तो बहुमताने निर्णय घ्यावा लागतो आणि हीच लोकशाही आहे. पण उद्धव ठाकरेंनी तसे काहीही केलेले नाही. त्यांनी कोणतीही लोकशाहीची मूल्ये पाळली नाहीत आणि आज निवडणूक आयोगाने (Election Commission) आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय किती चुकीचा आहे त्याची ओरड करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (Deepak Kesarkar)

(हेही वाचा – Vice Admiral AN Pramod : व्हाईस ॲडमिरल एएन प्रमोद यांची नौदल संचालन महासंचालकपदी नियुक्ती)

…आमच्यावर आरोप करता हे कितपत बरोबर आहे? केसरकरांचा सवाल 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वतः लोकशाही विरोधी कृत्ये करायची आणि मग लोकांच्या मनात चुकीचे समज पसरावायचे हे काम उबाठा गटाकडून (UBT Group) सुरु आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारावर चालतात म्हणून बाळासाहेबांनी लिहिलेल्या घटनेला आम्ही बांधील आहोत. पक्षाच्या घटनेतील ध्येय-धोरणांचे अनुसरण करणे हे पक्षातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि हेच निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये लिहिलेले आहे. पण तुम्ही ते करणार नाही आणि आम्ही त्यानुसार चालतो म्हणून आमच्यावर आरोप करता हे कितपत बरोबर आहे? असा सवाल केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. (Deepak Kesarkar)

आपण महायुती म्हणून निवडणूक लढलो. महायुती म्हणून जनतेने आपल्याला निवडून दिले आणि आज स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षघटनेच्या ध्येय-धोरणांना पायदळी तुडवून काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करणे कितपत योग्य आहे, याचे उत्तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी द्यावे. स्वतः वाईट वागायचे, लोकप्रतिनिधींना कधी भेटायचे नाही. त्यांचा वारंवार अपमान करायचा आणि मग ते पक्ष सोडून गेल्यानंतर त्यांच्यावर पैसे खाण्यासाठी पक्ष सोडला म्हणून घाणेरडे आरोप करायचे, हा अधिकार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कुणी दिला? असा सवाल दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उपस्थित केला. (Deepak Kesarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.