शिवसेना भवनाशेजारी याठिकाणी होणार शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय?

83

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच दादरच्या शिवसेना भवन जवळच शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

याठिकाणी होणार कार्यालय

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी जोगेची पाहणी करण्यात येत होती. दादर आणि ठाणे परिसरांत शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उघडण्यात येईल, असे शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. दादर पश्चिम येथील शिवसेना भवनापासून जवळच असलेल्या वास्तू सेंट्रल इमारतीत दुस-या मजल्यावर शिंदे गटाचे कार्यालय होऊ शकतं, असे सांगण्यात येत आहे.

आता आमने-सामने लढाई

या इमारतीपासून काही अंतरावरच कोहिनूर मिलची जागा आणि शिवसेना भवन आहे. या इमारतीमध्ये दोन मजले भाड्याने घेण्यात येणार असून शिंदे गट आपले मध्यवर्ती कार्यालय स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे शिंदे गट आणि शिवसेना हे न्यायालयीन लढाई लढत असतानाच आता मध्यवर्ती कार्यालयातून सुद्धा या दोन्ही गटांमध्ये आमने-सामने लढाई होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.