संजय राऊतांना चमचा ही निशाणी द्या; शिंदे गटाच्या नेत्याची टोलेबाजी

107

शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते सातत्याने एकमेकांवर टीकेची झोड उठवत असतात. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेंकावर वार पलटवार केले जात आहेत. सीमा प्रश्नावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदार-खासदारांवर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाकडूनदेखील जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाचे बुलढाणा येथील खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊतांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिले.

संजय राऊत यांनी सीमा प्रश्नावरुन शिंदे गटाच्या आमदार- खासदारांना लक्ष्य केले होते. तोंडाला कुलूप लावून बसलेल्या या लोकांना कुलूप निशाणी द्यावी, असे राऊतांनी म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राऊतांना चमचा ही निशाणी मिळावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे म्हटले आहे. संजय राऊतांसारख्या लोकांना भविष्यात चमचा निशणी मिळावी, अशी मागणी निडवणूक आयोगाकडे करणार असल्याचा टोला शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.

( हेही वाचा: हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख)

राऊत काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची चमचेगिरी करतात

सीमाप्रश्नी आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी यासाठी आंदोलन केले. चाळीस दिवस ते जेलमध्ये राहिले. पोलिसांचे दांडे खाल्ले. मात्र, संजय राऊतांसारखे नेते काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची चमचेगिरी करण्यात वेळ घालवत असल्याचा टोला प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.