“उद्या भेटायला येतोय…”, Sachin Ahir यांचा शरद पवारांना फोन; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ‘गेम’?

84
"उद्या भेटायला येतोय...", Sachin Ahir यांचा शरद पवारांना फोन; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा 'गेम'?
  • प्रतिनिधी

Sachin Ahir              ​राज्याच्या राजकीय पटलावर एक अत्यंत अनपेक्षित आणि खळबळजनक घटनाक्रम समोर आला आहे. शिवसेना उबाठाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले आणि नुकतेच विधान परिषदेचे उपसभापती म्हणून बिनविरोध निवडले गेलेले सचिन अहिर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सर्वेसर्वा शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. (Sachin Ahir)

​या अनपेक्षित फोनकॉलने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर यांनी शरद पवार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि “मी उद्या आपल्याला भेटायला येतो, त्यानंतर सविस्तर चर्चा करू,” असे सूचित केले. धक्कादायक म्हणजे, पक्षात मोठी बंडाळी होऊनही आणि अहिर यांनी भूमिका बदलूनही शरद पवार यांनी त्यांना उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. (Sachin Ahir)

(हेही वाचा – MSRTC Nashik News : एसटी महामंडळात ‘निलंबनाचा’ धडाका; एकाच फटक्यात नाशिकमधील ११ बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई!)

​फोनवर जास्त चर्चा न करता, प्रत्यक्ष भेटीवर भर देत अहिर यांनी पवारांशी संवाद साधला. शिवसेना उबाठाला रामराम ठोकून शिवसेनेत सामील झालेल्या आणि अवघ्या काही दिवसांत महत्त्वाच्या घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या सचिन अहिरांनी शरद पवारांशी संपर्क साधल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (Sachin Ahir)

​आता या भेटीत नक्की काय खलबतं होणार? सचिन अहिरांच्या मनामध्ये नक्की काय आहे आणि या भेटीचे आगामी राजकारणावर काय परिणाम होतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही मोठा ‘गेम’ होणार का, हे स्पष्ट होणार आहे. (Sachin Ahir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.