Gopinath Munde : शरद पवार तुमच्यावर ही अशीच वेळ येणार; गोपीनाथ मुंडे यांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल

Gopinath Munde : आमची घरे फोडून, पुतण्यांना विरोधात उभे करून तुम्ही मला आणि बाळासाहेबांना खूप मनस्ताप दिला. शरद पवार, तुमच्यावर ही अशीच वेळ येणार, असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी त्या वेळी भाषणात दिला होता.

417
Gopinath Munde : शरद पवार तुमच्यावर ही अशीच वेळ येणार; गोपीनाथ मुंडे यांचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल
Gopinath Munde : शरद पवार तुमच्यावर ही अशीच वेळ येणार; गोपीनाथ मुंडे यांचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत बरीच मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन वेगळी चूल मांडल्यानंतर राजकारणातील काका-पुतण्याचे नाते पु्न्हा प्रकाशात आले. सध्या लोकसभा निवडणुकांचा काळ आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे शरद पवार पुन्हा बळ एकवटून लेकीचे राजकीय भवितव्य सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा – Pune Sasoon Hospital : ICU मध्ये उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक प्रकार)

या व्हिडिओमध्ये गोपीनाथ मुंडे म्हणाले आहेत की, काय झालंय राज्यातील सगळ्या पुतण्यांना ? बाळासाहेबांना त्रास झाला, मला त्रास झाला. आता शरद पवार (Sharad Pawar) तुमची बारी आलेली दिसते. आमची घरे फोडून, पुतण्यांना विरोधात उभे करून तुम्ही मला आणि बाळासाहेबांना खूप मनस्ताप दिला. शरद पवार, तुमच्यावर ही अशीच वेळ येणार, असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी त्या वेळी भाषणात दिला होता.

आताची राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पहाता गोपीनाथ मुंडे यांचे हे शब्द आता खरे ठरले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट पडली आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील वैर मात्र मिटत असल्याचे चित्र आहे. (Gopinath Munde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.