Sharad Pawar on Kejriwal : शरद पवार यांचे अरविंद केजरीवाल यांना समर्थन; ट्वीट करून म्हणाले…

Sharad Pawar on Kejriwal : भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात 'इंडि आघाडी' एकजुटीने उभा आहे, असे x या माध्यमावर शरद पवार यांनी म्हटले आहे.

234
Sharad Pawar on Kejriwal : शरद पवार यांचे अरविंद केजरीवाल यांना समर्थन; ट्वीट करून म्हणाले...
Sharad Pawar on Kejriwal : शरद पवार यांचे अरविंद केजरीवाल यांना समर्थन; ट्वीट करून म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने मद्य धोरण घोटाळाप्रकरणी 21 मार्चच्या रात्री अटक केली. दिल्ली उच्च न्यायालायाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ईडीने तात्काळ कारवाई केली. मुख्यमंत्रीपदावर असतांना अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून केजरीवाल यांचे समर्थन केले आहे. (Sharad Pawar on Kejriwal)

(हेही वाचा –  IPL 2024, CSK vs RCB : चेन्नई विरुद्ध बंगळुरूचा मुकाबला हा धोणी वि. विराट असा मुकाबला )

शरद पवार यांनी केले ट्वीट

सार्वत्रिक निवडणुका (Loksabha Election 2024) तोंडावर आल्यावर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा तीव्र निषेध. भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडि आघाडी’ एकजुटीने उभा आहे, असे x या माध्यमावर शरद पवार यांनी म्हटले आहे.

९ वेळा बजावले होते समन्स

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. प्रत्येक वेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणे टाळले. त्यामुळे त्यांना अटक होणार याची खात्री होती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतरच इडीने कारवाई केली. (Sharad Pawar on Kejriwal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.