Sharad Pawar : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत दिसले युवा नेता; सर्वांना आश्चर्य वाटले 

जे युवा नेते दिसले ते शरद पवारांसोबत याआधी कधी दिसले नव्हते.

132

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतो, पण कोणतेही जबाबदारीचे पद स्वीकारणार नाही, असे शरद पवार Sharad Pawar यांनी जाहीर केले. ज्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी यांची घोषणा केली, त्यामध्ये मात्र पवारांच्या मागे बसलेले युवा नेतेच खूप चर्चेत आले. जे युवा नेते दिसले ते शरद पवारांसोबत याआधी कधी दिसले नव्हते. आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, सोनिया दूहन, धिरज शर्मा आणि राष्ट्रवादीचे इतर युवा नेते यावेळी दिसत होते.

या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते हमखास उपस्थित असणार असे सर्वांना वाटत होते. कारण  शरद पवारांच्या Sharad Pawar कोणत्याही निर्णयावेळी हे नेते त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. पण आता ते चित्र दिसत नव्हते. जेव्हा पवार म्हणाले की, भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तेव्हा अनेकांना वाटले की मोठा बदल होणार आहे. शरद पवारांनी 2 मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली. आज जेव्हा पवारांनी आपणच अध्यक्षपदावर कायम राहणार अशी घोषणा केली, तेव्हा जाणीवपूर्वक आणखी एक घोषणा केली. संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे असे पवार Sharad Pawar म्हणाले. पण जेव्हा पवार हे बोलत होते तेव्हा त्यांची फ्रेमही बोलत होती. कारण फ्रेममध्ये पहिल्या फळीत ज्येष्ठ नेते होते आणि दुसऱ्या फळीत पक्षाचे तरुण नेते.

(हेही वाचा The Kerala Story चित्रपटाबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.