Shalini Thackeray : एकनाथ शिंदे, अजित पवार असे अनेक तयार होतील; पण राज ठाकरे एकमेवाद्वितीय!

शालिनी ठाकरे यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू

90
Shalini Thackeray : एकनाथ शिंदे, अजित पवार असे अनेक तयार होतील; पण राज ठाकरे एकमेवाद्वितीय!
Shalini Thackeray : एकनाथ शिंदे, अजित पवार असे अनेक तयार होतील; पण राज ठाकरे एकमेवाद्वितीय!

एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे भरपूर तयार होतील, पण स्वतःच्या ताकदीवर वाटचाल करणारा राज ठाकरे एकमेवाद्वितीय नेता असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी काढले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून आगामी काळात महायुतीच्या विरोधात मनसेची भूमिका असेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Shalini Thackeray)

सन २००६ साली शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. नारायण राणे बाहेर पडून काँग्रेस तर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती. परंतु राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करून आजपर्यंत स्वबळावर वाटचाल केली आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी फूट पडली. त्यानतंर फुटीचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात गेला आणि पक्षाचे नाव व चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली असून पक्षाचे नाव आणि चिन्हांची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. (Shalini Thackeray)

(हेही वाचा – Shivsena Mla Disqualification : अडीच तास चालली शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, काय झाले नेमके जाणुन घ्या)

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मूळ पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. यासाठी नारायण राणे, गणेश नाईक आणि राज ठाकरे यांचा संदर्भ दिला जात आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेवर कधीच दावा केला नाही असे म्हणत राजकीय विरोधक देखील राज ठाकरे यांचे कौतुक करताना दिसत आहेत. मात्र या मुद्द्यावर राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आजपर्यंत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली नाही. आज शालिनी ठाकरे यांनी थेट नाव घेत शिंदे, पवार यांना लक्ष केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Shalini Thackeray)

शालिनी ठाकरे यांनी ट्विट केले आहे की, पक्ष फोडून पक्षाची मालकी ताब्यात घेणारे अनेक एकनाथ शिंदे आणि अजित पवार तयार होतील पण आपल्या मनगटाच्या ताकदीवर स्वतःची स्वतंत्र वाटचाल करणारा एकमेवाद्वितीय ‘राज ठाकरे’च शालिनी ठाकरे यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Shalini Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.