Shahu Maharaj : काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या शाहू महाराजांना का पाठिंबा द्यावा; कोल्हापुरातील मतदाराचा थेट सवाल; ऑडिओ क्लिप व्हायरल

Shahu Maharaj : महाराज राममंदिराला विरोध करणाऱ्या आणि कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या काँग्रेससोबत गेले, हे दुःखाचे झाले. या संभाषणाच्या क्लीपने कोल्हापुरात खळबळ उडवून दिली आहे.

285
Chhatrapati Shahu Maharaj यांचा दत्तकविधी गुप्तपणे झाला...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांचे वंशज शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. या निर्णय त्यांनी स्वतः घेतला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाराज जात असताना सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा; म्हणून महाराजांच्या कार्यालयातून कोल्हापुरातील मतदारांना संपर्क करून त्यांना महाराज अर्ज भरतेवेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यालयातील कर्मचारी करत आहेत, असाच एक फोन एका मतदाराला गेला, त्याचे संभाषण सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो मतदार थेट म्हणाला की, महाराज एकवेळ अपक्ष उभे राहिले असते, तर सर्वसामान्य जनतेने स्वखर्चाने त्यांचा प्रचार केला असता, पण महाराज राममंदिराला विरोध करणाऱ्या आणि कलम ३७० चे समर्थन करणाऱ्या काँग्रेससोबत गेले, हे दुःखाचे झाले. या संभाषणाच्या क्लीपने कोल्हापुरात खळबळ उडवून दिली आहे.

(हेही वाचा – काँग्रेसच्या नेता Supriya Shrinate यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; छत्तीसगडमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांना म्हटले ‘हुतात्मा’)

काय म्हणतो तो मतदार? 

आम्ही महाराजांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी का यावे? गादीला आम्ही मान देतोच, मुघल मर्दिनी ताराराणी यांनी स्थापन केलेल्या गादीचा आम्हाला अभिमान आहे. पण शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेस पक्षाचे चुकीचे तिकीट घेतले. राम मंदिराच्या (Ram mandir Ayodhya) विरोधात ज्या पक्षाने २५ वर्षे न्यायालयात विरोध केला होता, राम काल्पनिक आहे, असे काँग्रेसने अलाहाबाद उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले,  म्हणजे काँग्रेसला राम मंदिर नको होते, याचा अर्थ महाराजांनाही राम मंदिर मान्य नाही असे आम्ही म्हणायचे का? मुघल मर्दिनी असे ज्या ताराराणी यांना आपण म्हणतो, त्यांचा इतिहास तरी महाराजांना माहित आहे का? उद्या त्यांची जयंती आहे, त्यांचा कुठे फोटोही तुम्ही सोशल मीडियात टाकला नाही. ताराराणी यांची जयंती त्यांच्या समाधीस्थळी जाऊन साजरी केली का? त्यांची समाधी कुठे आहे, हे तरी माहित आहे का त्यांना? महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवली असती, तर जनतेने पदरचा पैसा खर्च करून प्रचार केला असता. का तर राजे आहेत म्हणून. जर ही गादी कोल्हापुरात नसती, ताराराणी यांनी गादीचे रक्षण केले नसते, तर तुम्ही आणि मी आता उर्दूत बोलत असतो. तुमच्या अंगावर हिजाब असता आणि मी गोल टोपी घातली असती. मोठ्या भावाचा शर्ट आणि बारक्या भावाचा पायजमा असे कपडे घातले असते. धर्म शिल्लक राहिला नसता. मंदिरावरचा कळस आणि दारासमोरची तुळस राहिली नसती. त्या मुघल मर्दिनी ताराराणी यांनी ही महाराजांची गादी स्थापन करून मुघलांना जर सळो कि पळो करून सोडले नसते, तर काय झाले असते? औरंग्याला याच मातीत गाडला. आम्हाला सगळे मान्य आहे, आम्हाला गादीचा आदर आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्पष्ट म्हटले आहे, ३७० कलम पुन्हा लागू करणार. त्याबद्दल महाराजांचे काय मत असणार आहे? का महाराजांनाही ३७० कलम (Article 370) परत आणायचे आहे. तिथे हिंदूंना पिटाळून लावले होते. महिलांवर अत्याचार केले. या सगळ्या गोष्टींना समर्थन असणार आहे का? आम्हाला बाकीचे काही नाही, त्यांनी पक्ष चुकीचा निवडला, तेवढा संदेश महाराजांपर्यंत पोहचावा.

महाराजांनी खुलासा करावा

ही ऑडिओ क्लिप केवळ कोल्हापुरातच (Kolhapur Loksabha) नाही, तर अवघ्या महाराष्ट्रात व्हायरल झाली आहे. कोल्हापूरच्या मतदाराने जे प्रश्न विचारले आहेत ते थेट आणि समर्पक आहेत, याचा खुलासा महाराजांनी करणे अपेक्षित आहे, अशी मागणी आता सर्वसामान्य जनता करू लागली आहे. (Shahu Maharaj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.