Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी 04 एप्रिलला सांगितले की, कोणत्याही भाषेला विरोध नाही कारण कोणीही आपल्या मातृभाषेपासून दूर राहू शकत नाही. तसेच संस्कृत ही जवळजवळ सर्व भारतीय भाषांची जननी आहे. दिल्लीत आयोजित १००८ संस्कृत संभाषण शिबिरांच्या समारोप समारंभात अमित शाह यांनी हे विधान केले. तसेच पुढे म्हणाले की, संस्कृतचा प्रसार हा केवळ तिच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न नाही. तर तो भारताच्या एकूण प्रगतीचे एक माध्यम आहे. (Amit Shah)
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : भारतीयांना जे हवे आहे तेच होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे स्पष्ट संकेत)
यावेळी अमित शाह यांनी नमूद केले की, अनेक प्रख्यात जागतिक विद्वानांनी संस्कृतला सर्वात वैज्ञानिक भाषा म्हणून मान्यता दिली आहे. भविष्याभिमुख दृष्टिकोनावर जोर देताना त्यांनी सांगितले की, संस्कृतच्या इतिहासावर विचार करण्याऐवजी, आता तिच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने संस्कृतच्या प्रचारासाठी विविध उपक्रम सुरू केल्याचे शाह यांनी सांगितले.
तसेच अमित शाह यांनी उल्लेख केला की, अष्टादशी योजनेअंतर्गत सुमारे 18 प्रकल्प राबवण्यात आले असून, भारत सरकार दुर्मीळ संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी आणि पुनर्मुद्रणासाठी आर्थिक सहाय्य देत आहे. शिवाय, प्रख्यात संस्कृत विद्वानांचे मानधनही वाढवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
(हेही वाचा – Dadar Dharavi नाल्याच्या सफाईसाठी मशिन नाल्यात उतरली, आम्ही नाही पाहिली! खरोखरच सफाई कि डोळ्यात धुळफेक?)
केंद्रीय गृहमंत्री यांनी अधोरेखित केले की, मोदी सरकारचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) भारतीय ज्ञान प्रणालीवर जोर देत असून, त्यात संस्कृत हा मध्यवर्ती आधारस्तंभ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 1981 पासून संस्कृत भारतीने केलेले कार्य खरोखरच अतुलनीय आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले.
संस्कृतमधील गहन ज्ञानाचे पुनरुज्जीवन, प्रसार आणि सरलीकरण याद्वारे जगातील अनेक आव्हानांचे निराकरण शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. आज इथे 1008 संस्कृत संभाषण शिबिरांचा समारोप झाला असून, 23 एप्रिलपासून 10 दिवसांच्या कालावधीत या शिबिरांद्वारे 17,000 हून अधिक सहभागींना संस्कृतची ओळख करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या काळात त्यांनी संभाषणात्मक संस्कृतचा सरावही केला, त्यामुळे जनतेमध्ये या भाषेबद्दल अधिक रुची आणि उत्साह निर्माण होण्यास मदत होईल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
(हेही वाचा – India-Pakistan War : तुर्की नौदलाची युध्दनौका कराची बंदरात, बिथरलेल्या पाकिस्तानने पसरले मित्रराष्ट्राकडे हात?)
गेल्या हजारो वर्षांपासून विविध शाखांमधील विचारमंथनातून निर्माण झालेले विपुल ज्ञान संस्कृतमध्ये संरक्षित आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच संस्कृत ही छंद आणि अक्षरांचा परिष्कृत वापर करणारी पहिली भाषा होती. त्यामुळे ती आजही जिवंत आणि प्रासंगिक आहे, असे विधान ही अमित शाह यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community