सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊत काय म्हणाले?

137
सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊत काय म्हणाले?
सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊत काय म्हणाले?

‘पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले,’ असा थेट आरोप ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून सोमवारी, ८मेला करण्यात आला होता. यावर सामना अग्रलेखाला महत्त्व देत नसल्याचे शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिले होते. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, ‘चांगली गोष्ट आहे, शरद पवार सामनाला महत्त्व देत नाही म्हणाले. मी कुठे म्हणतो महत्त्व द्या कोणी. शरद पवार साहेब आमच्या सर्वांचे नेते आहेत.’

शरद पवार नक्की काय म्हणाले होते?

आम्ही पक्षात काय करतो, हे राऊतांना माहित नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहित नाही. पक्षातील अनेक नेत्यांना कॅबिनेट मंत्री करून संधी दिली आहे. पण आम्ही कोणाला संधी दिली आणि काय केले हे जाहीर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होत तो आमच्या घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचे काम करतो त्यांनी काहीही लिहू दे, असे शरद पवार मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.