संजय राऊत म्हणतात, आता कारागृहात बसून वाचा हनुमान चालीसा

101

हनुमान चालिसाला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाहीये. हनुमान चालिसाला कोणी विरोध केला? काल ते जेलमध्ये होते, तिथे वाचू शकतात. आता त्यांना कुठल्यातरी जेलमध्ये पाठवले आहे, तिथे त्यांनी वाचावी हनुमान चालिसा. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन वाचावी, एखादे मोठे सभागृह घ्यावे तिथे त्यांनी वाचावे. या महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केलेला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचेल, तुम्ही घुसून वाचणार मग आम्हीही घुसू. तुमच्या बापाचे राज्य आहे का?, असे संजय राऊत म्हणाले.

तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होईल 

महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्याने होते, असे म्हणत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीने अशी कारस्थाने करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो, असे ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

(हेही वाचा सोनिया गांधींच्या औषधोपचारासाठी एमएफ हुसेनचे पेंटिंग खरेदी करण्यास गांधी कुटुंबाने टाकलेला दबाव

हे खूप मोठे षडयंत्र!

राणा दाम्पत्याच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे. हे खूप मोठे षडयंत्र आहे, कारस्थान आहे. त्यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलम योग्य आहेत असे मला वाटते. अशा प्रकारे राज्य उठवण्याचा कट धर्माच्या नावावर महाराष्ट्रात नाही, तर कुठेही होऊ नये. पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा अन्य राज्य असतील, अशाप्रकारे जर कोणी लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीने अशी कारस्थाने करत असेल, तर त्यांच्यावर नक्कीच राजद्रोहाचा खटला दाखल होतो. हे काही आज होत नाही. भीमा-कोरोगावमध्ये अनेक विचारवंत, लेखक, कवी यांना अटक करुन राज्य उठल्याचा कट त्यांच्यावर मागच्या सरकारने लावला आहे. त्यामुळे त्यांनी आता आम्हाला शिकवू नये. हे मोठे षडयंत्र आहे, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.