Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग जरी वेगवान असला, तरी…’ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला सल्ला 

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी, २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झाले. 

169

समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकर बसवण्यात यावी, अशी विनंती करतो. महामार्गावर १२० ची किमी वेग मर्यादा असली, तरी सर्व गाड्या या वेगात चालण्यायोग्य नाहीत. त्यामुळे अशा गाड्या घेऊन वेगाने जाऊ तर अपघात होऊ शकतो. महामार्ग जरी वेगवान असला, तरी आपलं जीवन त्यापेक्षा मुल्यवान आहे. म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी, २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झाले.

राज्याचा विकास करायचा असेल, तर मागास भाग मुंबई आणि बंदरला जोडणे आवश्यक होते. अनेकांना केवळ स्वप्न आणि घोषणा वाटायची. पण, मला आणि एकनाथ शिंदेंना विश्वास होता, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आज ते होताना दिसत आहे. ‘अंदाज कुछ अलग है, मेरे सोचनेका, सबको मंजिलोका शौक हे, और मुछे रास्ते बनाने का, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्गासाठी जागा हस्तांतरित करण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत कायदा केला. न भुतो असा दर जागेसाठी दिला. पण, अनेक लोकांनी याला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला जाऊन सभा घेतली. हा महामार्ग होऊ देणार नाही, असे सांगितले. शरद पवार यांनी नगर जिल्ह्यात बैठक घेत, हे शक्य नसल्याचे म्हटले, मात्र, ज्या गावात जाऊन विरोध केला, तेथील लोकांनी स्वत:हून जमीन देण्यास तयार असल्याचे पत्र दिले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील पंधरा जिल्ह्यांचे भाग्य समृद्धी महामार्ग बदलणार आहे. मुंबई आणि पुण्याचा विकास व्हायचा. पण, आता गोंदियापर्यंत विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगधंदे, कृषी समृद्धी या सर्व गोष्टी महामार्गामुळे तयार करू शकणार आहोत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

(हेही वाचा Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री शिंदे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.