Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री शिंदे

या महामार्गावर १३ आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभे करत आहोत. नागपूरमधून माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला मुंबईत पोहचायला १५ तास लागायचे आता ७ तासांत पोहचत आहेत.

91

आम्ही जे बोलतो ते जाहीरपणे बोलतो, काही लोक बंद खोलीत बोलतात, बाहेर काय कुणाला माहित असते, पण शेवटी सत्य बाहेर आलेच. आमचे सगळे उघड असते, असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता ‘बंद खोलीतील चर्चे’च्या विषयावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्मिक टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

या महामार्गाला मुद्दाम विरोध करण्यात आला. भूसंपादनासाठी मी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटलो, त्यावेळी एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या खरेदी खतावर मी साक्षीदार म्हणून सही केली आणि पुढच्या तीन तासांत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्यामुळे हे काम पूर्ण झाले. सगळे शेतकरी सकारात्मक झाले. समृद्धी शेतकऱ्यांची झाली आहे. हा रस्ता शेतकऱ्यांचे आयुष्य बदल घडवू शकतो. मुंबई-पुण्याचा लोकांनाही या महामार्गाचा फायदा होणार आहे. आपण आता ऍक्सेस कंट्रोल रस्त्याने अन्य जिल्हे जोडत आहोत. सगळे जिल्हे महामार्गाशी जोडत आहोत. लोकांचा वेळ वाचला पाहिजे, इंधन बचत झाली पाहिजे. या महामार्गावर १३ आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभे करत आहोत. नागपूरमधून माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला मुंबईत पोहचायला १५ तास लागायचे आता ७ तासांत पोहचत आहेत. गोंदिया, गडचिरोली सारखे राज्याच्या शेवटचे टोकही या महामार्गाला जोडले जाणार आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आज शासन आपल्या दारी हा चांगला कार्यक्रम झाला, हजारो लोकांनी त्यांचा लाभ घेतला. एका छताखाली दाखले आणि योजनांचे लाभ दिले. लोकांच्या दारी जाऊन त्यांची सेवा सुरु केली. काही लोक पाहतो आहे, कोण कुणाच्या दारी जात आहे, कारण नरेंद्र मोदी जे काम करत आहेत, त्यावरून त्यांना पोटशूळ उठला आहे, आम्ही मात्र जनतेच्या दारी जात आहोत आमच्यासाठी जनता महत्वाची आहे. हे काम करणारे सरकार आहे. शिर्डी विमानतळाचे नवीन टर्मिनलचे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.