‘या दोन गडांवरील अनधिकृत बांधकामेही हटवा’, संभाजीराजेंची सरकारकडे मागणी

131

प्रतापगडावर अफजल खानाच्या थडग्याभोवती करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम प्रशासनाकडून तोडण्यात आले आहे. शिवप्रताप दिनी ही कारवाई करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक करण्यात येत असून शिवप्रेमींकडून याबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. याचबाबत आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले असून काही सूचना केल्या आहेत.

प्रतापगडासोबतच आणखी दोन किल्ल्यांची नावे सूचवत संभाजीराजे यांनी आणखी दोन गडांवरील अतिक्रमणे हटवण्याची देखील मागणी केली आहे. संभाजीराजे यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे.

(हेही वाचाः महाराजांची जगदंबा तलवार लवकरच महाराष्ट्रात आणणार, सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा)

संभाजीराजे यांचे ट्वीट

अफजल खानाच्या कबरी जवळील अतिक्रमण काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. याबरोबरच विशाळगड, लोहगड अशा इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत केली आहे.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

संभाजीराजे यांनी केलेल्या मागणीसंदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील भाष्य केले आहे. संभाजीराजे यांनी केलेल्या सूचनेवर राज्य सरकार नक्कीच सकारात्मक प्रयत्न करेल. याबाबत आम्ही नक्कीच संभाजीराजेंशी बोलून घेऊ, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. तसेच राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केल्याबाबत उदय सामंत यांनी संभाजीराजेंचे आभार देखील मानले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.