Sajnay Raut : “हो हा आमचा ‘हिरवा’ विजय”

721
Sanjay Raut : ‘न्याययंत्रणा नादान झालीय’; राऊत यांची टीका
Sanjay Raut : ‘न्याययंत्रणा नादान झालीय’; राऊत यांची टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (Shiv Sena UBT) गटाला मिळालेला विजय हा ‘भगवा’ नाही तर ‘हिरवा’ आहे, अशी कबुलीच शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sajnay Raut) यांनी आज गुरुवारी (६ जूनला) सकाळच्या सत्रात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच राज ठाकरे यांच्या मनसेला ‘सुपारीबाज’ असा टोला मारत “यावेळेला सगळ्या सुपारीबाज पक्षांचे ‘बारा’ वाजले. दुकानं बंद झाली. सगळ्या सुपऱ्या जनतेने व्यवस्थित फोडल्या,” अशी टीका राऊत यांनी केली. (Sajnay Raut)

आरोप अप्रत्यक्ष मान्य

कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाची देशभरात ओळख असलेले ‘हिंदुत्व’ सोडले आणि मुस्लिम समाजाला जवळ केले, असा आरोप केला जात होता त्यात तथ्य असल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहेच. हा आरोप राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केला. शिवसेना उबाठाला लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय हा ‘भगवा’ नाही तर ‘हिरवा’ आहे असं आरोप मनसेने (MNS) केल्याबाबत राऊत (Sajnay Raut) यांना विचारले असता ते म्हणाले, “हो ठीक आहे. हिरवा आहे, पुढे काय?”

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहली रोनाल्डोच्या खालोखाल सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेला ॲथलीट)

‘ते’ अधिकृत मतदार

काही महिन्यापूर्वीपर्यंत बांग्लादेशी घुसखोर म्हणून ज्या समाजाचा उल्लेख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना करत असे ‘ते’ आता ‘अधिकृत मतदार’ आहेत, असे राऊत म्हणाले. इतकेच नव्हे, तर राऊत यांनी नाव न घेता मुस्लिम (Muslim) समाजाचा पाठींबा आणि मते मिळाल्याचे समर्थनही केले. “ते मतदार नाहीट का या देशाचे? सुरुवातीला तुम्हाला मतदान करत होते तेव्हा ‘ते’ ‘हिरवे’ नव्हते वाटतं? तुम्ही पक्ष स्थापनेच्यावेळी ‘टोप्या’ घालून फिरत होता. आज लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी जर या देशाचा ‘अधिकृत’ मतदार आम्हाला जात, पंथ, धर्म न पाहता मतदान करत असेल तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? यांनी प्रचार करूनही यांचा पराभव झाला आणि आम्ही ३०-३१ जागा जिंकलो यामुळे यांच्या पोटात दुखतंय,” असे सांगत राऊत यांनी मनसेवर टीका केली.  (Sajnay Raut)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.