Virat Kohli : विराट कोहली रोनाल्डोच्या खालोखाल सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेला ॲथलीट

Virat Kohli : विराट कोहलीने क्रिकेटच्या मैदानाबाहेर आपली लोकप्रियता या निमित्ताने दाखवून दिली आहे

79
Virat Kohli : विराट कोहली रोनाल्डोच्या खालोखाल सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेला ॲथलीट
Virat Kohli : विराट कोहली रोनाल्डोच्या खालोखाल सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेला ॲथलीट
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा सुपरस्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohli) लोकप्रियता आता क्रिकेट बाहेरच्या जगातही वाढत आहे. नुकतंच त्याने सोशल मीडियातील एक माध्यम ट्विटरवर ६३.५ दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला. त्याबरोबरच त्याने ब्राझीलचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरलाही मागे टाकलं आहे. नेमारचे ६३.४ दशलक्ष फॉलोअर आहेत. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे सध्या १११.४ दशलक्ष इतके फॉलोअर आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत विराटचाच नंबर लागतो.  (Virat Kohli)

(हेही वाचा- T20 WC, Ind vs Ire : भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, खेळपट्टीवर मात्र होतेय टिका )

अर्थात, इथं फक्त क्रीडा जगतातील स्टार खेळाडूच गृहित धरले आहेत. न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रॉस टेलरने (Ross Taylor) अलीकडेच जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंविषयी बोलताना विराटचा उल्लेख ‘ग्लोबल सुपरस्टार’ असा केला होता. विराटने क्रिकेटचं नाव जगभरात पोहोचवंल असल्याचं रॉस टेलरचं म्हणणं होतं. विराटच्या क्रिकेटसाठीच्या योगदानाची तुलना त्याने लायनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोशी केली होती.  (Virat Kohli)

‘क्रिकेटपटू आता जागतिक हीरो होत आहेत. त्यांना बॉलिवूड स्टार, राजकीय नेते यांच्यासारखी प्रसिद्धी मिळत आहे. आणि त्यांचं आयुष्यही सार्वजनिक झालं आहे. पण, अनेक अर्थाने ही चांगली गोष्ट आहे. कारण, याचा क्रिकेट आणि खेळाडूंनाही फायदा होतो आहे. विराट कोहली मेस्सी, रोनाल्डोसारखा जागतिक स्टार आहे. क्रिकेटला त्याला अभिमान आहे,’ असं टेलर एका पॉडकास्टमध्ये म्हणाला. (Virat Kohli)

कोहली सध्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) खेळण्यासाठी अमेरिकेत आहे. तिथेही त्याच्या लोकप्रियतेचा प्रत्यय येतो आहे. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.