
प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागात वादाचे वारे पुन्हा जोरात वाहू लागले आहेत. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील(Rupali Thombre-Patil)यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे पक्षात नवे समीकरण तयार होण्याची चर्चा रंगली आहे.(Rupali Thombre-Patil)
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप करत आंदोलने केली होती. चाकणकर यांनी आत्महत्या केलेल्या तरुणीचे चारित्र्यहनन केले, असा ठोंबरे यांचा दावा होता. या वक्तव्यामुळे पक्षाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.(Rupali Thombre-Patil)
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आता ठोंबरे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. संघटक सरचिटणीस संजय खोडके यांनी ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षशिस्त भंग केल्याबद्दल ठोंबरे यांना फक्त सात दिवसांत खुलासा देण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.(Rupali Thombre-Patil)
(हेही वाचा –Mumbai Crime : मुंब्र्यात छेडछाडीला कंटाळून हिंदू तरुणीची आत्महत्या; आसिफ अहमदसह पाच जणांना अटक)
या नोटिशीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याही हातात पोहोचली आहे.(Rupali Thombre-Patil)
दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले “ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी आम्ही आवाज उठवला, त्यांच्या संदर्भात स्पष्टीकरण मागितलं जातंय. मात्र सात दिवस हा कालावधी अत्यल्प आहे. मी वैयक्तिक हितसंबंध, हगवणे प्रकरण, तसेच आमच्या भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यहनन प्रकरणाचा संपूर्ण खुलासा सविस्तर देणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.(Rupali Thombre-Patil)
पक्षात शांततेचा सूर साधला जाईल की वाद आणखी भडकणार हे येणारे दिवस ठरवतील.(Rupali Thombre-Patil)

