राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी कालवश

125
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी कालवश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदन दास देवी यांचे आज म्हणजेच सोमवार २४ जुलै रोजी पहाटे कर्नाटकच्या बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या, मंगळवारी २५ जुलै रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

मदन दास देवींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले. आयुष्यातील जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपपर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.

(हेही वाचा – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा – मुख्यमंत्री शिंदे)

मदन दास देवी यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटरच्या माध्यमातून गडकरी म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आदरणीय मदन दास देवी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. माझ्या विद्यार्थीदशेपासूनच मला मदन दासजींसोबत काम करण्याची, त्यांच्याकडून संघटनात्मक कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली. चार्टर्ड अकाउंटंटमध्ये सुवर्णपदक मिळवूनही देश आणि समाजासाठी झोकून देत त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने देशाने एका महान व्यक्तीला गमावले आहे. मदनदासजींचे कार्य, त्यांची मूल्ये माझ्यासारख्या करोडो कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील अशा शब्दात गडकरींना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.