धर्मनिरपेक्षतेचे पितळ उघडे पडले…

106

इंग्लंडच्या पंतप्रधान पदावर भारतीय वंशाचे ऋषी सुनक विराजमान झाले आहेत. ही घटना निश्चितच आनंद देणारी आहे. या गोष्टीचा निर्भेळ आनंद घेण्याची मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक क्षमता नसलेल्या लोकांनी या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी अल्पसंख्य समाजाच्या हिंदूला पंतप्रधानपदावर विराजमान केले. हिंदुस्थानात असे घडणार का? असा प्रश्न विचारून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन जगाला देशातल्या काही स्वतःला विद्वान म्हणवणाऱ्यांनी घडवले.

मुसलमान या देशाचा पंतप्रधान कधीही होणार नाही

हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष देश आहे, असा कंठशोष करणाऱ्या या मंडळींची धर्मनिरपेक्षता किती पाखंडी आहे याची पुन्हा एकदा साक्ष पटली. हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी मुसलमान कधी विराजमान होणार? असा प्रश्नही या लोकांच्या विकृत मनोवृत्तीतून मुखाद्वारे बाहेर पडला. हा देश धर्मनिरपेक्ष आहे याचा अर्थ धर्म, जात, पंथ याकडे लक्ष न देता देशातील प्रत्येक नागरिक हा देशाचा नागरिकच असतो. त्या नागरिकाकडे पाहताना त्याची जात, पात, पंथ याकडे लक्ष द्यायचे नसते. हीच खरी धर्मनिरपेक्षता आहे. मुसलमान या देशाचा पंतप्रधान कधीही होणार नाही आणि त्याला करू नये. अशीच इच्छा देशातल्या प्रत्येक हिंदू नागरिकाची आहे.‌ यामागचे कारण असे की हमीद अन्सारी यांनी हिंदुस्थानचे उपराष्ट्रपती पद भूषवले. भारतीय जनतेने त्यांना योग्य तो मान दिला. पण या माणसाने आपली राष्ट्रनिष्ठा व्यक्त केली नाही. उपराष्ट्रपतीपदावर विराजमान असताना हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी त्यांचा हात वर गेला नाही. असा अनुभव जर देशाच्या नागरिकांच्या गाठी असेल तर देशातला कोणता नागरिक मुसलमान वंशाचा पंतप्रधान व्हावा अशी अपेक्षा ठेवेल.‌ उपराष्ट्रपती पदावरून निवृत्त होताच मुसलमान या देशात सुरक्षित नाहीत असे कृतघ्नतेचे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर आले. अशा व्यक्ती विषयी कोणाच्या मनात आदरभाव असेल?

(हेही वाचा देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)

मुसलमान अतिरेकी नाहीत पण सर्व अतिरेकी मुसलमानच

कश्मीरमध्ये मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या मुसलमान मुख्यमंत्र्यांनी अतिरेक्यांची बाजू घेतलेली दिसते. सैन्यावर दगड फेकणाऱ्यांच्या पाठीशी सत्ताधारी उभे राहत असतील तर अशा प्रकारची वृत्ती असलेल्या समाजातल्या व्यक्तीला हिंदुस्थानच्या पंतप्रधान पदावर विराजमान करण्याचा मूर्खपणा देशाचा कोणताही सुजाण नागरिक करणार नाही. सर्वच मुसलमान अतिरेकी नाहीत पण सर्व अतिरेकी मुसलमानच आहेत हे सुद्धा विसरता येत नाही.‌ आता मुद्दा राहिला तो धर्मनिरपेक्षतेचा.‌ धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राष्ट्रनिष्ठा, या देशाची ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा यांचा अभिमान जो बाळगतो आणि समाज जीवनात, राष्ट्र जीवनात वावरताना आपली राष्ट्रनिष्ठा उजळमाथ्याने व्यक्त करतो तो खरा धर्मनिरपेक्षवादी आहे. मी धर्माने हिंदू, ख्रिश्चन, यहुदी, मुसलमान, पारशी असा कोणत्याही धर्माचा असलो तरी मी या देशाचा नागरिक आहे. या देशाच्या हिताच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट मी लाथाडणार. माझ्या वैयक्तिक जीवनात मी माझ्या धर्माचे पालन करीन.‌ पण राष्ट्रीय जीवनात वावरताना माझा धर्म राष्ट्राच्या, समाजाच्या हिताच्या आड येणार नाही याची काळजी घेईन. असा विचार आणि आचार करून देशात जो वावरतो तो धर्मनिरपेक्ष आहे. अशा विचारांनी भरलेल्या मुसलमान समाजाचे डॉ. ए.पी.जे कलाम यांनी राष्ट्रपतीपद भूषवले. देशाचा मिसाईल मॅन म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसणारा कोणताही भारतीय नागरिक या देशाचा पंतप्रधान होण्याच्या पात्रतेचा आहे.‌ अन्य कोणीही पंतप्रधानपदाचा दावा करू लागला तर त्याला या देशातली जनता स्वीकारणार नाही.‌ असा विचार मांडण्याऐवजी ज्यांनी या आनंदावर विरजण घातले त्या लोकांची मानसिक, वैचारिक आणि बौद्धिक पातळी किती निकृष्ट दर्जाची आहे याची साक्ष देते. त्याचवेळी धर्मनिरपेक्षतेबाबतचे त्यांचे पितळ उघडे करते.‌ यापेक्षा अधिक सांगणे न लगे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.