दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव; PM Narendra Modi यांचे टीकास्त्र

77

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दंगल आणि गुंडगिरी हा काँग्रेसचा स्वभाव आहे. काँग्रेसचे एक महाज्ञानी आजकाल मध्य प्रदेशात फिरत आहेत. महाज्ञानीसारख्यांच्या विचारसरणीने देश उद्ध्वस्त केला आहे. जिथे जिथे काँग्रेस आली, तिथे विनाश झाला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली.

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे मध्य प्रदेशात प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेस शेतकरी, तरुण आणि महिलांची शत्रू आहे. ती जे काही करते, ते एका कुटुंबाच्या नावावर करते. काँग्रेसला तुमच्या कुटुंबाची पर्वा नाही. आज संपूर्ण मध्य प्रदेश म्हणत आहेत की, पुन्हा एकदा भाजपाचे सरकार. काँग्रेसकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त निराशा, विरोध आणि नकारात्मकता आहे. काँग्रेस स्वभावानेच दंगल आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते. देशातील कोणतीही व्यक्ती काँग्रेसचे कारनामे विसरू शकत नाही. भाजपाने मध्य प्रदेशला अतिशय खोल विहिरीतून बाहेर काढले आहे. 3 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील तेव्हा देश दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करेल. मध्य प्रदेशात भाजपाचा झंझावात लोकांच्या प्रचंड पाठिंब्याने काँग्रेसला उखडून टाकेल, असे  पंतप्रधान मोदी म्हटले. जिथे काँग्रेस सत्तेवर आहे, तिथे फक्त लूट, लूट आणि फक्त लूट हाच त्यांचा उद्देश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.