फेरीवाला क्षेत्रात पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा, उर्वरितांचे सर्वेक्षण करा: भाजपची मागणी

88

मुंबईतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी फेरीवाला क्षेत्र बनवण्यात आले. परंतु २०१९ च्या सर्वेक्षणाला स्थगिती दिल्यामुळे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा बासनात गुंडाळला गेला. त्यामुळे नियुक्त फेरीवाला क्षेत्र (हॉकिंग झोन) मधील हॉकिंग पिचेस पात्र फेरीवाल्यांना द्यावेत आणि आमचे उर्वरित रस्ते आणि फूटपाथ मोकळे करावे अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच नवीन सर्वेक्षण एकाच वेळी केले जावे, अशीही मागणी केली आहे.

(हेही वाचा – रस्त्यांच्या छोट्या निविदा न काढता शहर व उपनगरासाठी स्वतंत्र कंत्राट द्यावी: भाजपची मागणी)

पत्राद्वारे केली विनंती

भाजपचे आमदार अमित साटम यांनी आपल्या पत्रात असे म्हटले की, शहरातील असंघटित फेरीवाल्यांचा प्रश्न विचित्र झाला आहे. त्याचे नियमन करण्याची गरज आहे. झोनल टाऊन व्हेंडिंग समित्यांनी हॉकिंग झोन निश्चित केले आहेत. आणि त्यात १.२८ लाख फेरीवाल्यांना हॉकर्सना हॉकिंग पिच वाटप करण्यास पात्र बनवले आहे. परंतु, मागील सरकारने २०१९ चे नवीन सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत या प्रक्रियेला अविचारीपणे स्थगिती दिली. त्यामुळे नियुक्त हॉकिंग झोनमधील हॉकिंग पिचेस पात्र फेरीवाल्यांना द्या आणि आमचे उर्वरित रस्ते आणि फूटपाथ मोकळे करा आणि नवीन सर्वेक्षण एकाच वेळी केले जाऊ शकते, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरण २०१४ रोजी मंजूर होऊन आजही हे धोरण भिजतच आहे. महापालिकेने १ मे २०१४ मध्ये १ लाख २८ हजार ४४३ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ९९ हजार ४३५ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, अर्जांच्या छाननीअंती केवळ १५ हजार ३६१ फेरीवाले पात्र ठरले असते. मुंबईतील एकू ४०४ रस्त्यांवर केवळ ३० हजार ८३२ फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याने २०१९ मध्ये नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, याला तत्कालीन सरकाने स्थगिती दिल्याने मुंबई महापालिकेने ही प्रक्रिया जैसे थेच ठेवली. परिणामी आज फेरीवाल्यांची बजबजपुरी माजली असून पदपथ पाठोपाठ आता रस्तेही फेरीवाले अडवू लागले आहेत. त्यामुळे पात्र फेरीवाल्यांचे पुनवर्सन होणे आवश्यक असून त्यांचे पुनर्वसन निश्चित केलेल्या फेरीवाला क्षेत्रात केल्यास अनेक रस्ते व पदपथ जनतेला चालण्यास मोकळे होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.