Ravikant Tupkar : माझे गुरु शरद जोशी, राजू शेट्टींची भूमिका तळ्यात-मळ्यात; रविकांत तूपकर यांची स्पष्टोक्ती

Ravikant Tupkar : पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असलेले रविकांत तुपकर यंदा लोकसभा स्वतंत्र लढवणार आहेत. त्यांनी राजू शेट्टी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे थेट सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

113
Ravikant Tupkar : माझे गुरु शरद जोशी, राजू शेट्टींची भूमिका तळ्यात-मळ्यात; रविकांत तूपकर यांची स्पष्टोक्ती
Ravikant Tupkar : माझे गुरु शरद जोशी, राजू शेट्टींची भूमिका तळ्यात-मळ्यात; रविकांत तूपकर यांची स्पष्टोक्ती

मुळात माझे गुरू शेतकरी चळवळीतले स्वर्गीय शरद जोशी आहेत. मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो, त्या वेळी मी शरद जोशींच्या संपर्कात आलो. त्यावेळी मी त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. मला जे काही चळवळीचे धडे मिळाले, ते स्वर्गीय शरद जोशींकडून (Sharad Joshi) मिळाले. निश्चितच मी राजू शेट्टींच्या (Raju Shetti) संघटनेत काम करत होतो, काम करतोय. पण त्यांची भूमिका सातत्याने बदलत असते. आधी ते म्हणत होते की, आम्ही 6 जागांवर स्वतंत्र लढू, त्यानंतर म्हणाले की, महाविकास आघाडीने मला एकट्याला पाठिंबा दिला, तर बाकीच्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यांची भूमिका फारच संशयास्पद आहे. त्यांनी भूमिका तशीच असते. त्यात काही नवीन नाही, असे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Nitin Gadkari : पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही; सध्याच्या राजकारणाविषयी काय म्हणतात नितीन गडकरी)

रविकांत तूपकर यांनी यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Sanghtana) राजू शेट्टी यांच्यासोबत काम केले आहे. तेच आज राजू शेट्टी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे थेट सांगत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत जाणार

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या वेळी म्हटले की, मी स्वतः माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. सामान्य लोकांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जनतेचा आग्रह आहे की, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याच आग्रहामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अतिशय जोरदार तयारी आमची सुरू आहे. लोक भरभरून वर्गणीही देत आहे. मी प्रस्थापितांसारखा निवडणूक लढवणार नाही, कारण मी चळवळीतला फाटका कार्यकर्ता आहे. गावागावातून एक लाख, दोन लाख रुपयांची वर्गणी माझ्यासाठी देत आहेत. संसदेच्या भिंतीनं कधी सोयाबीन हा शब्द ऐकला नाही आणि त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मी संसदेत जाण्याचं ठरवलं आहे. (Ravikant Tupkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.