Rashmi Barve यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार

गेल्या आठवड्यात राज्य सरकारने रश्मी बर्वे यांच्या चौकशीचे नव्याने आदेश जारी केले होते. तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनेही रश्मी बर्वे यांना नोटीस बजावली होती. समितीने त्यांना अवघ्या २४ तासांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

122
Rashmi Barve यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार

रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आहे. यासंदर्भात बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. परंतु, न्यायालयाने याप्रकरणी तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात सोमवारी १ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणुका सुरळीत पार पाडण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची – डॉ. किरण कुलकर्णी)

माझ्यावर करण्यात येत असलेली कारवाई बेकायदेशीर :

रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सामाजिक न्याय विभागाकडून माझ्यावर करण्यात येत असलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा रश्मी बर्वे यांनी केला आहे. राजकीय कारणासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र गुरुवारी (२८ मार्च) रद्द करण्यात आले. त्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी बर्वे (Rashmi Barve) यांनी नागपूर खंडपीठाकडे केली होती. न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. आता या प्रकरणाची सुनावणी सोमवार १ एप्रिल रोजी होणार आहे.

(हेही वाचा – Mukhtar Ansari : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू)

राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश नव्याने जारी :

याचिकेनुसार बर्वे (Rashmi Barve) यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधीचा मुद्दा नागपूर खंडपीठाने नुकताच निकाली काढला. मात्र, गेल्या आठवड्यात राज्य सरकारने रश्मी बर्वे यांच्या चौकशीचे नव्याने आदेश जारी केले होते. तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनेही रश्मी बर्वे यांना नोटीस बजावली होती. समितीने त्यांना अवघ्या २४ तासांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. हे नैसर्गिक न्यायाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर करताच विरोधकांनी त्यांच्यावर तक्रारी केल्या. यातील एका तक्रारीच्या आधारे जिल्हा जात पडताळणी समितीने तर दुसऱ्या तक्रारीवर थेट सामाजिक न्याय विभागाने नोटीस बजावली आहे. ही सर्व कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तसेच जिल्हा जात पडताळणी समिती व सामाजिक न्याय विभागाने बजावलेली नोटीस रद्द करावी, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांनी एड. समीर सोनवणे यांनी युक्तीवाद केला.

(हेही वाचा – Election King Padmarajan : 238 वेळा निवडणुका हरलेले के. पद्मराजन; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधील या विक्रमाची तुम्हाला माहिती आहे का ?)

मी घाबरणार नाही, मी अबला नाही : 

तसेच मी (Rashmi Barve) यांना घाबरणार नाही.. मी अबला नाही. महिला दुर्गेचे रुप असते. मी महिषासुराचा नाश करेन. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे तुम्ही कोण. हे बेटी बचाव, बेटी पढावच्या गप्पा करतात. माझे जात प्रमाणपत्र रद्द करणारे ते कोण आहेत, असा हल्लाबोलही रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.