Rajya Sabha Election: महाराष्ट्रात भाजपचा मविआला धक्का; तर इतर राज्यांचे असे आहेत निकाल

98

चार राज्यांतील 16 राज्यसभेच्या जागांसाठी शनिवारी पहाटे मतमोजणी पूर्ण झाली. महाराष्ट्राचा निकाल शेवटी लागला. महाराष्ट्रात भाजपला तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे एक जागा मिळाली. हरियाणामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून ज्येष्ठ नेते अजय माकन यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हरियाणात भाजपचे कृष्णलाल पनवार आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा विजयी झाले. राजस्थानबाबत बोलायचे झाले तर येथे काँग्रेसला तीन जागा मिळाल्या, तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्रात मविआला धक्का

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपला तीन, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे एक जागा मिळाली. भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांना 48 मते मिळाली. याशिवाय भाजपचे उमेदवार अनिल बोंडे 48 मतांनी विजयी झाले, तर भाजपचे धनंजय महाडिक 41.58 मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे  संजय राऊत 41 मतांनी, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी 44 मते मिळवून विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना 43 मते मिळाली.

कर्नाटकात भाजपचा शानदार विजय

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागांवर मतदान झाले. भाजपला तीन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. एचडी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएसला एकही जागा मिळाली नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते जगेश आणि लहारसिंग सिरोया भारतीय जनता पक्षाकडून विजयी झाले, तर काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश विजयी झाले आहेत.

( हेही वाचा: राज्यसभा निवडणुकीचा चित्तथरारक निकाल, कोल्हापूरच्या ‘या’ मल्लानं अखेर मारलं मैदान )

राजस्थानमध्ये काँग्रेसने मारली बाजी

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे तीनही उमेदवार प्रमोद तिवारी, रणदीप सुरजेवाला आणि मुकुल वासनिक हे राजस्थानमधून विजयी झाले, तर भाजपचे माजी मंत्री घनश्याम तिवारी हेच विजयी झाले. राजस्थानमधून भाजपने पराभूत झालेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला होता.

असा आहे हरियाणाचा निकाल

हरियाणामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून ज्येष्ठ नेते अजय माकन यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हरियाणात भाजपचे कृष्णलाल पनवार आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा विजयी झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.