राज ठाकरेंच्या भाषणानंतर सांगलीतील बेकायदा मशिदीवरही पडणार हातोडा

4

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत राज्यात ठिकठिकाणी मुसलमानांकडून बेकायदा मशिदी उभ्या होत असल्याचा मुद्दा मांडताना मुंबईतील माहीम समुद्रकिनाऱ्याकडील बेकायदा दर्गा आणि सांगली-कुपवाडा महापालिका क्षेत्रातील बेकायदा मशिदीचा उल्लेख केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने माहीम येथील अनधिकृत दर्गा हटवला, आता सांगलीतील बेकायदा मशिदीवरही हातोडा मारण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर राज्य सरकार सतर्क झाले. त्यानंतर सांगली-कुपवाडा महापालिका आणि पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले. ताबडतोब विभागाकडून या ठिकाणी नव्या रचनेच्या माध्यमातून या जागेची मोजणी करण्यात आली. यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी या जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा स्पष्ट केले. या जागेवर सांगली महापालिका शाळेचे आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर हे आरक्षण आहे. त्यामुळे या जागेवरील अनधिकृत मशिदीचे बांधकाम तोडण्यात येईल, असे पवार म्हणाले.

(हेही वाचा सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना दिली समोरासमोर ऑफर; म्हणाले…)

काय आहे प्रकरण? 

मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगलीच्या जुना कुपवाड रोडवरील मंगलमूर्ती कॉलनी या ठिकाणी बेकायदेशीररित्या मशिद बांधण्यात येत असल्याचा मुद्दा आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली. सकाळपासून घटनास्थळी तणावपूर्ण शांतता होती. हिंदू समाजातील नेत्यांबरोबर मुस्लिम समाजातील नेते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. महापालिकेनेही तातडीने या घटनेची गंभीर दखल घेऊन घटनास्थळी पोहचत जागेची मोजणी केली. नगररचना विभागाकडून ही मोजणी करण्यात आली. त्याचबरोबर या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जागेवर महापालिकेच्या प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर जागेवर हे आरक्षण असून या ठिकाणी ज्या जागेवर बांधकाम करण्यात आलेले आहे. त्या जागेवर असणारे बांधकाम अनाधिकृत आहे. त्यामुळे ते तात्काळ पाडण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.