Raj Thackeray : टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेचं काय झालं? – राज ठाकरे

135
Raj Thackeray : टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेचं काय झालं? - राज ठाकरे

राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यात मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे पक्षबांधणी करण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी ही बैठक होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोल नाक्याची केलेली तोडफोड, सध्याचे राजकारण, मनसेची युती इत्यादी मुद्द्यांवर भाष्य केले.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

ठाकरे गट किंवा भाजपसोबत मनसे युती करणार का? असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ‘कुणी कुणाला भेटलं म्हणून लगेच युती होत नसते’, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मागे एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. तेव्हा शरद पवार आले होते. त्यामुळे लगेच युती झाली का? युती हा तुमच्या बुलेटीनचा भाग असेल. त्याचा आमच्याशी काही संबंध नसतो, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी युतीच्या प्रश्नावर आपले मत मांडले.

(हेही वाचा – Khadakwasla Dam : खडकवासला धरणाचे दोन दरवाजे उघडले)

टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेचं काय झालं?

मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यामुळे झालेल्या वादातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी (२३ जुळी) टोलनाक्याची तोडफोड केली. त्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले, “अमित सध्या महाराष्ट्रभर दौरा करतोय. तो काही टोलनाके फोडत चालला आहे असं काही नाहीये. एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला. त्या टोलनाक्यावर अमितची गाडी बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरीदेखील त्याला थांबवून ठेवलं होतं. तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवलं. मग ही फोडाफोडी झाली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता आणि समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ही मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही. भाजपाने टीका करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीआधी जी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? ते सांगावं. हे जे टोलनाके आहेत ते म्हैस्कर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका आहे? हा कोणाचा लाडका आहे? यावरही त्यांनी बोलावं.”

सध्याचं पवारांचं राजकारण म्हणजे मिलीभगत

सध्याच्या राजकारणावर बोलतांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पवारांचं सध्याचं राजकारण म्हणजे एक मिलीभगत असल्याचे म्हंटले आहे. तसेच सत्तेत पवारांची पहिली टीम सामील झाली आहे, तर दुसरीही लवकरच होईल. जे सांगत होते ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार ते आता एकत्र आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.