राज ठाकरेंचा अल्टिमेटम देशभरात पसरला! हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या 

116

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेतही मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्याची मागणी केली. त्यासाठी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला. राज ठाकरे यांची भूमिका देशभरात पसरली आहे. त्या भूमिका देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. मशिदींसमोर दुप्पट भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्याच्या आवाहनाला हिंदुत्ववादी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गोवा, कर्नाटकात भोंग्यांना विरोध 

३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे सरकारने मौलवींसोबत चर्चा करून हटवावे अन्यथा मशिदीसमोर भोंगे लावत हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी व्यासपीठावरून केवळ राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर तेथेही हनुमान चालीसा लावावी असे आवाहन केले होते. आता राज ठाकरेंच्या विधानाचे समर्थन करण्यासाठी अनेक हिंदू संघटना पाठिशी आल्या आहेत. कर्नाटकात भाजपानेही मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. तर गोव्यात हिंदू जनजागृती समितीने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून गोव्यातील मशिदीवरील भोंगे हटवावे, असे निवेदन दिले आहे. मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजान दिली जाते त्यावरून गोव्यातही वाद सुरू झाला आहे. गोव्यातील हिंदुत्ववादी संघटना दक्षिण आणि उत्तर गोव्यातील मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. भाजपा सरकारने याबाबत प्रशासकीय आदेश लागू करावेत असे आवाहन केले आहे.

(हेही वाचा ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.