एकदा काय ते होऊनच जाऊदे! महाराष्ट्राच्या मनगटाची ताकद दाखवून द्या! राज ठाकरेंचा भोंग्यांवरून इशारा  

136

सर्वोच्च न्यायालयाचे नियम सांगता ना, जर माझ्या या सभेच्या वेळी बांगेचा आवाज येत असेल तर तो आधी पोलिसांनी बंद करावा. आताच त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा, त्यानंतर जे महाराष्ट्रात होईल त्याची जबाबदारी माझी नसेल. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल, तर एकदाच काय ते होऊन जाऊदे, अजिबात शांत बसता कामा नये. संभाजी नगरच्या पोलिसांना नम्र विनंती. ते जर याच पद्धतीने वागणार असतील, तर महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद दाखवली पाहिजे, असे सांगत हे भोंगे उतरले गेले पाहिजे, मंदिरावरीलही भोंगे उतरले पाहिजेत, पण आधी मशिदींवरील भोंगे उतरले पाहिजे. पोलिसांकडून रितसर परवानगी घेऊनच हनुमान चालीसा लावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

(हेही वाचा बाबरी पाडली तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता नव्हता! देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)

४ मे नंतर ऐकणार नाही!

उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जाऊ शकतात मग महाराष्ट्रात का उतरवले जात नाही. सगळे भोंगे अनधिकृत आहेत. संभाजीनगरात ६०० मशिदी आहेत. बागेचे कॉन्सर्ट चालते का? सगळ्यांना सामान नियम असला पाहिजे. आम्ही सभा घेतली कि म्हणतात इथे शाळा आहे, मंदिर आहे. यांना कुठेही परवानगी मिळते. रस्त्यावर येऊन नमाज पडतात, कुणी अधिकार दिला? ३ मे रोजी ईद आहे. त्या सणात विष कालवायचे नाही. ४ मे रोजी ऐकणार नाही. जिथे जिथे लाऊड स्पीकर लागतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. लाऊड स्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

तर या विषयाला धर्माचे वळण देईन! 

मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न कधी काढायचाच नाही का? हा विषय नवीन नाही. याआधी बऱ्याच जणांनी हा विषय काढला होता. मी फक्त त्याला पर्याय दिला. मी म्हणालो, हनुमान चालीसा बोलू असे म्हटले होते. मला राज्यात दंगली घडवायच्या नाहीत. मुस्लिम समाजानेही नीट समजून घ्यावे. परवा एक मुस्लिम पत्रकार मला भेटला. तो म्हणाला, माझे लहान मुल मशिदीवरील भोंग्यांमुळे आजारी पडायचे, त्याने मौलवींना सांगितले त्यामुळे आवाज कमी झाला. हा विषय सामाजिक आहे, धार्मिक नाही. जर तुम्ही या विषयाला धर्माचे वळण देणार असला, तर आम्हीही त्याला धर्माने उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

(हेही वाचा राज ठाकरे एकमेव बाळासाहेबांचे राजकीय वारसदार! मनसैनिकांची बॅनरबाजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.