Rahul Narvekar : ‘… म्हणून निकाल चुकीचा ठरत नाही’ ; ठाकरे गटाच्या टीकेला राहुल नार्वेकरांचे चोख उत्तर

निकालात काय चुकीचे आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. माझ्या निकालावर बोलण्यापेक्षा त्यांनी घटना दुरुस्तीकडे लक्ष दिले असते, तर बरे झाले असते”, अशा खोचक शब्दात नार्वेकरांनी ठाकरेंना उत्तर दिले.

210
Rahul Narvekar : '... म्हणून निकाल चुकीचा ठरत नाही' ; ठाकरे गटाच्या टीकेला राहुल नार्वेकरांचे चोख उत्तर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काही दिवसांपूर्वी आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरणावर आपला निर्णय दिला. मात्र त्यांच्या या निर्णयावर दोन्ही गटाकडून म्हणजेच शिवसेना आणि ठाकरे गट यांच्याकडून दिलेल्या निकालावर टीका होत आहे. अशातच आता राहुल नार्वेकर यांनी या सगळ्याला उत्तर दिलं आहे. मी हा निर्णय कोणाला खुश करण्यासाठी नाही दिला, तर कायद्याला धरूनच हा निकाल दिला आहे.

(हेही वाचा – Iran-Israel Conflict: इराकमधील मोसाद केंद्रावर आणि सीरियामध्ये आयएसच्या केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला)

नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर ?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) एका मुलाखतीत म्हणाले की, “आमदार अपात्रतेचा निकाल कुणाला खुश करण्यासाठी दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांनुसार हा निकाल दिला आहे. आता त्याविरोधात घटनेनुसार कोणताही नागरिक न्यायालयात दाद मागू शकतो.”

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir vs Congress workers : अयोध्येत भाविक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)

म्हणजे निकाल चुकीचा ठरत नाही –

राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की; “उद्धव ठाकरे यांच्या गटाने निकालाविरोधात याचिका दाखल केली म्हणजे निकाल चुकीचा ठरत नाही. निकालात काय चुकीचे आहे, हे त्यांना दाखवून द्यावे लागेल. माझ्या निकालावर बोलण्यापेक्षा त्यांनी घटना दुरुस्तीकडे लक्ष दिले असते, तर बरे झाले असते”, अशा खोचक शब्दात नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ठाकरेंना उत्तर दिले.

(हेही वाचा – Parel Accident News: परळ पुलावर दुचाकी-डम्परमध्ये भीषण अपघात; दोन तरुणी, एका तरुणाचा जागीच मृत्यू)

… तर तुमच्यावर हा प्रसंगच आला नसता –

“२०१८ मध्ये खरंच शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती का? ठाकरे गटाने दिलेली घटना ग्राह्य धरायची की शिवसेनेने १९९९ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेली घटना ग्राह्य धरायची? २०१३ मध्ये झालेल्या पक्षप्रमुखपदाच्या (Rahul Narvekar) निवडीचा इथे विषयच नाही. ठाकरे गटाने माझे फोटो दाखवण्यापेक्षा, मी कुठे होतो याचे व्हिडीओ दाखवण्यापेक्षा वेळेत आणि खरोखर घटना दुरुस्त केली असती आणि ती आम्हाला दाखवली असती तर तुमच्यावर हा प्रसंगच आला नसता”, अशा शब्दांमध्ये राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.