राहुल गांधींचे लोकसभेतील भाषण म्हणजे बालिश कृत्य, बालक बुद्धी; PM Narendra Modi यांची जोरदार फटकेबाजी 

हिंदू सहनशील आहे, त्यामुळे भारताची लोकशाही, विविधता सुरक्षित आहे. आज हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचा कट रचला जात आहे. हिंदू हिंसक असतो असे म्हणाले. हे तुमचे संस्कार आहे का, हा तुमचा विचार आहे का? देश हे शतकानुशतके विसरणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांना सुनावले.

117

पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांनी सर्व नियमांचे पालन करून भाषण केले, त्यांचे भाषण अनुभवी खासदारासारखे वाटले, त्यामुळे सभागृहाची प्रतिमा सुरक्षित राहिली, अशा वाक्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी संसदेत भाषणाला सुरुवात केली, विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्यावर मोदींचा रोख होता. त्यामुळे लागलीच विरोधी पक्षाचे खासदारांनी गदारोळ माजवण्यास सुरुवात केली. तरीही पंतप्रधान मोदी यांनी भाषण सुरूच ठेवले. मी काही लोकांची पीडा समजतो, जे सलग खोटे बोलूनही त्यांचा घोर पराभव झाला, असे सांगत सध्या सहानुभूती मिळवण्याचा नव्याने प्रयत्न सुरु आहे. एक मुलगा शाळेतून येताना रडत होता तेव्हा त्याची आई घाबरली, तेव्हा तो शाळेत अमुक एकाने मारले तमुक याने मारले, पण कारण सांगत नव्हता. तोच मुलगा हे सांगत नव्हता की त्याने कुणाला तरी आईवरून शिवी दिली होती, कुणाचे तरी पुस्तक फाडले होते. आम्ही काल सभागृहात हेच बालिश कृत्य पाहिले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

काँग्रेसच्या तोंडाला खोट्याचे रक्त 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) बोलत होते. काल असाच सभागृहात एक मुलगा रडत होता, तो हे सांगत नव्हता कि त्याचा बहिणीचा नवरा भ्रष्टाचाराच्या आरोपावर जामिनावर बाहेर आहे, वीर सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी त्याच्यावर खटला दाखल आहे, अधिकारी, संस्थांवर खोटे बोलल्याचा आरोप आहे. बालक बुद्धीला ना बोलण्याचा ठिकाणा असतो ना व्यवहार जाणतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसने खोट्याला राजकारणाचे हत्यार बनवले. काँग्रेसच्या तोंडाला खोट्याचे रक्त लागले आहे. काल १ जुलै रोजी खटाखट दिवस साजरा केला. लोक बँक अकाउंट तपासत होते की खात्यात ८,५०० रुपये जमा झाले का? पण त्यांची निराशा झाली. कारण काँग्रेसने खोटे नेरेटिव्ह पसरवून महिलांना फसवले, त्या काँग्रेसला महिला विसरणार नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा Rahul Gandhi यांच्या भाषणावर भाजपचे नेते संतापले; माफी मागण्याची केली मागणी)

बालकबुद्धी म्हणून दुर्लक्ष करणे चुकीचे 

संविधानशी खिलवाड करणे शोभा देत नाही. जो पक्ष ६० वर्षे या देशाच्या संसदेत बसला आहे. अनुभवी नेत्यांची फौज आहे. तो पक्ष खोट्याचा आधार घेत आहे, हा संविधानाचा अपमान आहे. काल जे संसदेत झाले ते गंभीरतेने घेतल्याशिवाय संसदेची प्रतिमा सुरक्षित राहणार नाही. बालकबुद्धी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे यामागे उद्देश भयंकर आहे. या लोकांचे खोटे जनतेच्या विवेकबुद्धीवर थप्पड मारण्याची निर्ल्लज्ज कृती आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

काँग्रेसने डॉ. आंबेडकरांसह अनेक दलित नेत्यांना संपवले

काँग्रेसने संविधान आणि आरक्षणवरही कायम खोटे बोलत आली आहे. आज १४० कोटी देशवासीयांसमोर सत्य मांडत आहे. आणीबाणीचे ५० वे वर्ष आहे. केवळ सत्तेच्या लोभापायी देशावर हुकूमशाहीने आणीबाणी थोपवली. आपल्याच देशवासीयांवर क्रूरतेचा पंजा मारला होता. काँग्रेसच्या दलितविरोधी, मागासवर्गीय विरोधी मानसिकतेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. सरकार अनुसूचित जातींची उपेक्षा करत असल्याने माझ्या मनातील आक्रोश सांभाळू शकत नाही, असे  डॉ. आंबेडकरांनी कारण दिले होते. डॉ. आंबेडकरांनी काँग्रेसवर नाराज होऊन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी डॉ. आंबेडकरांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अनेक दलित नेत्यांना काँग्रेसने असेच संपवले, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

देवतांचा अपमान करून १४० जणांच्या भावना दुखावला 

हिंदू सहनशील आहे, त्यामुळे भारताची लोकशाही, विविधता सुरक्षित आहे. आज हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचा कट रचला जात आहे. हिंदू हिंसक असतो असे म्हणाले. हे तुमचे संस्कार आहे का, हा तुमचा विचार आहे का? देश हे शतकानुशतके विसरणार नाही. हिंदू दहशतवाद असा शब्द यांनीच रुजवला, हिंदू धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया म्हणणाऱ्यांसोबत हे लोक टाळ्या वाजवतात आणि हे हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदूंची चेष्टा करण्यात त्यांनी हयात घालवली. ईश्वराचे सगळे रूप दर्शनासाठी असते, ज्याचे दर्शन होते त्याचे प्रदर्शन होत नाही. आमच्या देवी देवतांचा अपमान करून १४० कोटी लोकांच्या भावना दुखावल्या. खासगी स्वार्थासाठी देवतांचा खेळ केला. सभागृहातील प्रकार पाहिल्यावर हिंदूंनी विचार करावा हा संयोग आहे कि भयंकर प्रयोगाचा भाग आहे, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.