Rahul Gandhi यांच्या भाषणावर भाजपचे नेते संतापले; माफी मागण्याची केली मागणी

124

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी सोमवार, 1 जुलै रोजी लोकसभेच्या सभागृहातील भाषणाचे पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात उमटले. हिंदू समाजाबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. त्याआधीच ओरिसाचे खासदार आणि भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांची बालक बुद्धी असल्यामुळे कुठे काय बोलावे त्यांना कळत नाही. समस्त हिंदू हे राहुल गांधी यांनी केलेला अपमान कधीच विसरणार नाही. त्यासाठी राहुल गांधी यांना माफी मागितली पाहिजे, असे म्हणाले.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा दुखावणाऱ्या राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आपल्या क्षुल्लक वक्तव्याबद्दल माफी मागावी. तर भाजपा नेते अविनाश गेहलोत यांनी तर राहुल गांधींना एंटरटेनर म्हटले आहे. यासोबतच सीपी जोशी आणि राजेंद्र राठोड यांनीही राहुलला फैलावर घेतले.राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, त्यांनी केवळ एका विशिष्ट समुदायालाच दुखावले नाही तर भारतमातेच्या आत्म्यालाही दुखावले आहे. आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर पेजवर लिहिले की, हिंदू धर्म हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. हे सहिष्णुता, औदार्य आणि कृतज्ञता या मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. आमचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी यांनीही सांगितले होते की, ‘आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा’ आणि आज देशातील प्रत्येक हिंदूला त्याच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे. हिंदू समाजाविषयी केलेले विधान, सभागृहात दाखवण्यात आलेले फोटो, अध्यक्षांकडे पाठ करून बोलणे अशा विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला.

(हेही वाचा Rahul Gandhi यांच्या भाषणावर आले नियमांचे गंडांतर; जाणून घ्या काय आहेत संसदेत बोलण्याचे नियम)

भाजपचे नेते सीपी जोशी यांनी राहुल गांधींच्या भाषणाबाबत म्हटले की, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) हिंदूंना हिंसक म्हणणे लज्जास्पद आहे. जोशी म्हणाले की, राहुल गांधी आपला राजकीय फायदा घेण्यासाठी हिंदू धर्म आणि हिंदूंची बदनामी करत आहेत. अशी खोटी आणि निराधार विधाने करणे पूर्णपणे निषेधार्ह आणि चुकीचे आहे. हे विधान हिंदू धर्माच्या मूलभूत शिकवणीचा अपमान तर आहेच, पण समाजात अशांतता आणि फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया जोशी यांनी व्यक्त केली. राहुल गांधीनी माफी मागायला हवी.

दरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांच्या भाषणादरम्यान दोनदा उभे राहून त्यावर भाष्य केले होते. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांच्या भाषणातील काही भाग लोकसभेच्या कामकाजातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राहुल यांनीही त्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कामकाजात भाषण पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आपल्या भाषणातील काही भाग वगळल्याचे समजल्यानंतर धक्का बसल्याचे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. अध्यक्षांना सभागृहाच्या कामकाजातून काही विधान काढून टाकण्याचा अधिकार आहे. पण केवळ लोकसभा नियम 380 मध्ये दिलेले शब्द हटवता येऊ शकतात, असे राहुल (Rahul Gandhi) यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.