Caste Census by Congress : राहुल गांधी यांनी पत्रकारांना विचारली जात; हिंदू मते जातीजातींत विभागण्याचा काँग्रेसचा अजेंडा उघड

106
Caste Census by Congress : राहुल गांधी यांनी पत्रकारांना विचारली जात; हिंदू मते जातीजातींत विभागण्याचा काँग्रेसचा अजेन्डा उघड
Caste Census by Congress : राहुल गांधी यांनी पत्रकारांना विचारली जात; हिंदू मते जातीजातींत विभागण्याचा काँग्रेसचा अजेन्डा उघड

दिल्ली येथे 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत काॅंग्रेसने जातीआधारित जनगणना हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. (Caste Census by Congress) या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पत्रकारांना कॅमेरासमोरच ‘या खोलीत किती ओबीसी, दलित आणि आदिवासी आहेत ?’, असा प्रश्न विचारला. या वेळी एकानेही प्रत्युत्तर म्हणून हात वर केला नाही. हा व्हिडिओ काँग्रेसने ट्विट केला आहे. यावर अनेकांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. काँग्रेस अशी भूमिका घेऊन जातीआधारित राजकारण करत आहे, यावर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी जोरदार टिका केली आहे. भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेसने समाजाला जातीजातीत विभागण्याचे षडयंत्र रचले आहे, अशी चर्चा सामाजिक माध्यमांत होत आहे. (Caste Census by Congress)

(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले मनोगत; म्हणाले…)

एका ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटले आहे, ”हिंदु-मुसलमान वाद केल्याने वातावरण खराब होते; मात्र पंडित, ठाकूर, बनिया, दलित, OBC, SC, ST करत रहा, त्याने वातावरणात गोडी येते.” अन्य एका वापरकर्त्यांनी राहुल गांधी यांनी आतापर्यंत अशियन गेम्स मधील विजेत्यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत; मात्र जातीआधारित राजकरण करायला वेळ आहे, याकडे लक्ष वेधले आहे. (Caste Census by Congress)

काँग्रेसची इतिहासाशी प्रतारणा 

१९८९ पासून जातीपातीचे राजकारण करणारे लालू यादव आणि नितीशकुमार यांच्याकडून हिंदू समाजाला जातींमध्ये विभागण्याचे सूत्र काँग्रेसने घेतले आहे. लालू यादव, मुलायमसिंह यादव आणि शरद यादव या नेत्यांच्या दबावाखाली व्ही. पी. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून सिंग सरकारने या सर्व नेत्यांच्या हाती जातीवादी राजकारणाचे हत्यार सोपवले होते. तोच कित्ता आताची काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गिरवत आहे. वास्तविक इंग्रजांनी 1931 मध्ये जेव्हा जातीवर आधारित जनगणना केली, तेव्हा काँग्रेस आणि महात्मा गांधी यांनी ‘समाजाची जडणघडण बिघडेल’, असा युक्तिवाद करून जातीआधारित जनगणनेला विरोध केला. 1931च्या जनगणनेनंतर मुस्लिम लीगने सुरू केलेल्या धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याच्या मोहिमेला काँग्रेसनेही विरोध केला होता. काँग्रेस आता मतपेढीसाठी समाजाला जातीजातीत विभागून स्वतःच्या नेत्यांशी आणि इतिहासाशी प्रतारणा करत आहे, अशी चर्चा चालू आहे. (Caste Census by Congress)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.