नियमाचा भंग करून प्रभाग पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार!

हा प्रस्ताव अचानक आयुक्तांच्या कार्यालयात बुलेट वेगाने आला, मग कार्यालयात सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून रिकाम्या कागदावर त्यांच्या साह्य घेण्यात आल्या, असे आशिष शेलार म्हणाले.

76

शिवसेनेला आता स्वतःच्या पराभवाची भीती वाटू लागली आहे. शिवसेनेची शेवटची फडफड सुरु झाली आहे. कितीही, कसेही प्रयत्न केले तरी सेनेचा मुंबई महापालिकेतील पराभव आता अटळ आहे. परंतु यात दुःख याचेच वाटते की, प्रथा, परंपरा आणि कायदा पायदळी तुडवला जात आहे. प्रभाग पुनर्रचनेचा प्रस्ताव बनवताना नियमांचा भंग केला आहे. त्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेसची मदत घेतली गेली आहे, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.

प्रस्तावाची माहिती अधिकाऱ्यांना नव्हती ! 

प्रभाग पुनर्रचनेच्या प्रस्तावाची निर्मिती महापालिकेच्या ना कुठल्या विभागातून झाली, ना कर निर्धारण विभागातून झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती. हा प्रस्ताव अचानक आयुक्तांच्या कार्यालयात बुलेट वेगाने आला, मग कार्यालयात सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून रिकाम्या कागदावर त्यांच्या साह्य घेण्यात आल्या. त्यानंतर प्रस्ताव टाइप करून निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला, हे आपण दाव्याने सांगतो. हिंमत असेल, तर आयुक्तांच्या कार्यालयातील  त्यांच्या दालनाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्यांसाठी खुले करावे, असे आव्हान शेलार यांनी दिले. एका बाजूला ८० हजार कोटी रुपयांपर्यंत ठेवी पोहचल्या असा टेम्भा मिरवायचा आणि दुसरीकडे महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याऐवजी कडू करण्याचे काम शिवसेना करत आहे, असा आरोपही शेलार यांनी केला.

(हेही वाचा : महापौर, आयुक्तांना पुरस्कारासाठी वेळ, पण सानुग्रह अनुदानावरील निर्णयासाठी नाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.