Pravin Darekar : केवळ भाषणे देऊन, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत

तोडा, फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचे बोलत असताना अडीच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावर आपण सरकारच्या माध्यमातून काय-काय कांड केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणि भाजपाच्या नेत्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलात हे उद्धव ठाकरे विसरले आहेत.

156
Pravin Darekar : उद्धव ठाकरेंना ना महाराष्ट्राचे प्रश्न माहित, ना त्यांनी आंदोलने केली; प्रविण दरेकरांचा घणाघात

उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. केवळ भाषणे देऊन, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस दिवसरात्र विकासासाठी झगडत आहेत. अशावेळी केवळ तुमचे भाषण, चार शिव्या घालणे, भावनिक वातावरण करून तुम्हाला तग धरता येणार नाही, असे भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Dr. Harsh Vardhan : लोकसभेचे तिकिट कापल्यानंतर माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर)

दरेकर पुढे म्हणाले की,

उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष रस्त्यावर आलाय याची विस्मृती झाली आहे. रस्त्यावरचे कार्यकर्ते, जनतेला भेटला असता तर आज भक्कमपणे आदरणीय बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना आपल्याला टिकवता आली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम करणारी लोकं अंधभक्त आहेत असे म्हणता. तुम्हाला ते अंधभक्त वाटताहेत परंतु त्यांच्या श्रद्धा मोदींच्याप्रती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला विकासाकडे, प्रगतीकडे नेत आहेत. बाळासाहेबांवर त्यांची श्रद्धा होती.(Pravin Darekar)

अडीच वर्षाच्या काळात तुम्ही काय-काय कांड केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे : दरेकर

तोडा, फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचे बोलत असताना अडीच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह (Pravin Darekar) माझ्यावर आपण सरकारच्या माध्यमातून काय-काय कांड केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणि भाजपाच्या नेत्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलात हे उद्धव ठाकरे विसरले आहेत. त्यांनी केवळ टीका टीपण्या करण्यापेक्षा पक्ष, संघटन मजबूत करावे. आलेल्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रचना उभी करावी. घोडा मैदान आता लांब नाही. हे येणाऱ्या लोकसभेत दिसून येणार आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आखली मोहीम; पंतप्रधान मोदी येत्या १० दिवसांत करणार १२ राज्यांचा दौरा)

आज एकही गरीब उपाशी राहत नाही :

जो-जो शब्द या देशातील सर्वसामान्य माणसाने दिला तो मोदींनी पूर्ण केला. गरिबांच्या कल्याणासाठी गरीब कल्याण अन्नधान्य योजना आणली. आज एकही गरीब उपाशी राहत नाही. महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या. शेतकरी, युवा आणि महिला वर्गाची विशेष काळजी घेणारे पंतप्रधान आहेत जुमलेबाज नाहीत. केंद्र-राज्याकडून शेतकऱ्यांना ६-६ हजार रुपये खात्यात जात आहेत. शेतकऱ्यांना दिलासा दिला गेला आहे. (Pravin Darekar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.