Prashant Kishor यांनी तेजस्वी यादव यांचे काढले वाभाडे; म्हणाले, ना भाषेचे ज्ञान, ना…

तेजस्वी यादव यांच्यासारखे नेते देशाला नवी दिशा देऊ लागले तर लालू-राबडी देवी यांनी बिहारची जी अवस्था केली होती, तशीच देशाचीही होईल, असे प्रशांत किशोर म्हणाले.

206
लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यासाठी बिहारमध्ये ४ जागांवर मतदान होणार आहे. त्याआधी प्रचाराची धामधूम सुरू आहे . अशातच निवडणूक प्रचाराचे रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आरजेडीचे आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे वाभाडे काढले.

काय म्हणाले प्रशांत किशोर? 

तेजस्वी यादव यांच्यासारखे नेते देशाला नवी दिशा देऊ लागले तर लालू-राबडी देवी यांनी बिहारची जी अवस्था केली होती, तशीच देशाचीही होईल. यामुळे देशाचे काहीही भले होणार नाही. तेजस्वी यांचे वडील लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी हे बिहारचे मुख्यमंत्री होते आणि तेजस्वी स्वतः उपमुख्यमंत्री होते, त्यांनी बिहारला दिशाहीन केले. जर बिहारच्या जनतेने तेजस्वी यादव यांना जबाबदारी दिली असेल तर त्यांनी बिहारमधील काही विभागांची स्थिती सुधारावी. बिहारमधील रुग्णालयांची स्थिती सुधारावी, बिहारमधील रस्त्यांची स्थिती सुधारावी, नाल्यांची स्थिती सुधारावी, असे प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले. तेजस्वी यादव यांना ना भाषेचं ज्ञान आहे, ना विषयाचं ज्ञान आहे. पण जर त्यांना धारदार भाष्य करायचं असेल तर ते बसून इस्रायल आणि पॅलेस्टाईनवर करतील. बिहारमधील गरीब मुलांच्या शरीरावर कपडे नाहीत, खायला अन्न नाही, रोजगार नाही पण ते गाझामध्ये काय चालले आहे, यावर टिप्पणी करत आहेत. समाजातील लोक निरर्थक बोलणाऱ्यांना तळागाळातील नेते मानतात, असे प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.