महाविकास आघाडीतील मंत्र्याच्या वादात ‘भुता’ची एन्ट्री! यशोमती ठाकूर यांच्या टिकेला बच्चू कडूंचं भन्नाट उत्तर

90

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्यात नवे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. बच्चू कडू यांच्या एन्ट्रीमुळे राज्यात संग्रामपूर नगर पंचायत निवडणूक गाजली. बुलढाण्यातील संग्रामपूर नगर पंचायत निवडणुकीत बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या 17 उमेदवारांना उभे केले अन् एकच जल्लोष केला. या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या स्टार मंत्री यशोमती ठाकूर यांची संग्रामपूर येथे एकाच दिवशी प्रचार सभा झाल्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी बच्चू कडू यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर

महाविकास आघाडीच्या स्टार मंत्री यशोमती ठाकूर सकाळी यशोमती ठाकूर यांची सकाळी प्रचार सभा झाली. यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, “आज आमच्या जिल्ह्यातील भूत या ठिकाणी येणार आहे…!” राज्यात संग्रामपूर नगर पंचायत निवडणूक गाजली. आता निवडणूक झाल्यावर बच्चू कडू यांना या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाली. बच्चू कडू यांनी आपल्या प्रचारसभेत या टीकेला उत्तर देताना म्हटलं की , “मी साधं सुध भूत नसून पंचमहाभूतातील एक भूत आहे, जे विकासाचं भूत आहे..!” असे प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा – प्रतिकात्मक का होईना लोहगडावर उरुस झालाच! दुर्गप्रेमींना दिल्या नोटीस)

बच्चू कडूंचा यशोमती ठाकूर यांच्यावर प्रहार

बच्चू कडू  यांनी यशोमती ठाकूर यांच्या टीकेला ट्वीट करून उत्तर दिले आहे.  बच्चू कडू यांनी ट्वीट करून म्हटले की, “भूत” लागल्या प्रमाणे विकास करावा हे आता आम्ही दाखवून देऊ. निवडणूकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले, जनतेने अनेक दिग्गजांना नाकारुन आम्हाला संधी दिल्या बद्दल धन्यवाद, असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.