Praful Patel : पक्ष एकसंघ राहण्यासाठी शरद पवारांसोबत चर्चा – प्रफुल पटेल

108
Praful Patel : पक्ष एकसंघ राहण्यासाठी शरद पवारांसोबत चर्चा - प्रफुल पटेल
Praful Patel : पक्ष एकसंघ राहण्यासाठी शरद पवारांसोबत चर्चा - प्रफुल पटेल

पक्ष एकसंघ रहावा, यादिशेने शरद पवार यांनी विचार करावा, अशी विनंती काल आणि आजही केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी काल (रविवारी) शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. काल (रविवारी) सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून बरेच आमदार उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे सोमवारी शरद पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत, हे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि प्रत्येक आमदारांनी पवारसाहेबांचे आशीर्वाद घेतले, असेही प्रफुल पटेल म्हणाले.

(हेही वाचा – दादर महात्मा गांधी जलतरण तलावांमधील महिलांच्या चेंजिंग रुमचीच दुरावस्था)

त्यांच्या मनात काय, ते माहित नाही!

रविवारी पवारसाहेबांनी जसं आमचं ऐकून घेतलं तसं आजही ऐकून घेतलं. त्यांच्या मनात काय आहे, हे मी कसे सांगू शकतो? मात्र आमचं म्हणणं ऐकून घेतलं हे आवर्जून सांगतो, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.