PM Narendra Modi यांच्या शपथविधिला ‘या’ देशांचे प्रमुख पाहुणे राहणार उपस्थित!

८ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेऊ शकतात. दिग्गज नेत्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

267
PM Narendra Modi यांच्या शपथविधिला ‘या’ देशांचे प्रमुख पाहुणे राहणार उपस्थित!

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ (PM Modi Swearing-in Ceremony) ८ जून रोजी घेणार आहेत. या सोहळ्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अभिनय क्षेत्रातील व्यक्ती, उद्योगपती, शेजारील देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रमुख जागतिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि मॉरिशसच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना खास आमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे (Sri Lankan President Ranil Wickremesinghe) यांच्या कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. 

(हेही वाचा – Weather Update: महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; यलोअलर्ट जारी)

कोणाला बोलावले आहे?
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख (Sheikh Prime Minister of Bangladesh) हसीना यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड (Pushpa Kamal Dahal Prachanda, Prime Minister of Nepal), भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे (Tshering Tobagy, Prime Minister of Bhutan) आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ (Prime Minister of Mauritius Pravind Jugnath) यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी सर्वप्रथम कोणाला बोलावले होते?
नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून पहिल्या शपथविधीसाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (SAARC) नेत्यांना आमंत्रित केले होते. सार्कमधील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य देश आहेत.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली रोनाल्डोच्या खालोखाल सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेला ॲथलीट)

२०१९ मध्ये नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या शपथविधी समारंभासाठी BIMSTEC म्हणजेच Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation या देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. BIMSTEC सदस्यांमध्ये बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका यांसह अनेक देशांचा समावेश आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.