PM Narendra Modi गुरुवारी पुणे मेट्रोचे लोकार्पण करणार ; जाणून घ्या काय आहेत मेट्रो स्थानकाचे वैशिष्ट्ये ?

166
PM Narendra Modi गुरुवारी पुणे मेट्रोचे लोकार्पण करणार ; जाणून घ्या काय आहेत मेट्रो स्थानकाचे वैशिष्ट्ये ?
PM Narendra Modi गुरुवारी पुणे मेट्रोचे लोकार्पण करणार ; जाणून घ्या काय आहेत मेट्रो स्थानकाचे वैशिष्ट्ये ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी (२५ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट (District Court to Swargate metro) हा पुणे शहरातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. गुरूवारी रात्री ८.३० नंतर पुणेकरांना शहरातील पहिली भूमिगत मेट्रोचा (Underground Metro Pune opening) मार्ग अनुभवता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रमानंतर हा मार्ग खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हे ३.६२ किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, दुपारच्या वेळेत जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी बंद राहणार आहे. तसेच टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.  (PM Narendra Modi)

Untitled design 96

असा असेल पुणे दौरा 

पंतप्रधान मोदी (PM Modi Pune Visit) सायंकाळी ५.३० वाजता पुणे विमानतळावर दाखल होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता विमानतळावरून स्वारगेटला मेट्रोच्या लोकार्पणासाठी जाणार आहेत. त्याठिकाणी मोदींच्या हस्ते स्वारगेट ते शिवाजीनगर या मेट्रोचा लोकार्पण सोहळा होईल. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता मोदी पुणे विमानतळाकडे रवाना होणार आहेत.   (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Akshay Shinde Encounter नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत पोस्टर झळकले!)

पार्किंगसाठी या जागा ताब्यात 

शहरातील नदीपात्र भिडे पूल, पाटील प्लाझा, न्यू इंग्लिश स्कूल- टिळक रोड, डी. पी. रोड- म्हात्रे पुलाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल- रमणबाग, हरजीवन हॉस्पिटल- सावरकर चौक, पीएमपी मैदान- पूरम चौक, निलायम टॉकीज, विमलाताई गरवारे शाळा, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कटारिया माध्यमिक शाळा, मिनर्व्हा पार्किंग- मंडई व हमालवाडा पार्किंग या ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ६५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. (PM Narendra Modi)

Untitled design 98

काय आहेत मेट्रो स्थानकाची वैशिष्ट्य? 

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट १० मिनिटांत स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रो 

* स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ तीन स्थानके

* अंतर ३.३४ किलोमीटर

* सर्व भूमिगत स्थानकांची कामे पूर्ण

* प्रवासी सोयीसुविधा आणि सुरक्षाविषयक कामे पूर्ण

* स्वारगेट स्थानक येथील पीपीपी तत्त्वावरील मल्टिमोडल हब या इमारतीचे काम अजून बाकी

* सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास केवळ १० मिनिटांत

* स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट स्थानकांमधील अंतर

* सिव्हिल कोर्ट ते कसबा मेट्रो स्थानक अंतर : ८५३ मीटर

* कसबा पेठ ते मंडई मेट्रो स्थानक अंतर : १ किमी

* मंडई ते स्वारगेट मेट्रो स्थानक अंतर : १.४८ किमी

* सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक एकूण अंतर : ३.३४ किमी

कात्रज ते निगडीपर्यंत प्रवास होणार शक्य (स्वारगेट ते कात्रज मेट्रो)

(हेही वाचा – Kangana Ranaut ला भाजपाने चांगलेच खडसावले; वादग्रस्त विधानापासून अंतर ठेवण्याची तंबी)

* स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गिका असणार

* ५.४६ किमीची विस्तारित मार्गिका असेल

* तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल

* मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज ही स्थानके

* २९५४.५३ कोटीपर्यंत खर्च येणार

* फेब्रुवारी २०२९ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य

* मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि कात्रज उपनगरांना जोडणार

* मेट्रोने थेट कात्रज ते निगडीपर्यंत प्रवास शक्य

* निविदा प्रक्रिया लवकरच

* दोन ते तीन महिन्यांनंतर

* प्रत्यक्ष कामाला सुरुवात

* भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन, द्विपक्षीय एजन्सी इत्यादींचे समानरीतीने सामाईक योगदान

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.