PM Narendra Modi : नरेंद्र मोदी केरळमधून निवडणूक लढणार

सूत्रानुसार, पंतप्रधान सध्या वाराणसी या मतदार संघांचे खासदार आहेत. मात्र २०२४ मधील निवडणूक ते येथून लढणार नाहीत. वाराणसीच नव्हे तर ते उत्तर भारताच्या कोणत्याही मतदार संघातून लढणार नाहीत.

233
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी केरळमधून निवडणूक लढणार
PM Narendra Modi : नरेंद्र मोदी केरळमधून निवडणूक लढणार
  • वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकसभेची (Lok Sabha Elections) आगामी निवडणुकीत कोणत्या मतदार संघातून मैदानात उतरणार याची जबरदस्त उत्सुकता लागली आहे. मतदार संघ अद्याप ठरला नसला तरी पंतप्रधान (PM Narendra Modi) विद्यमान वाराणसीमधून निवडणूक लढविणार नाही ही बाब आता जवळपास निश्चित झाली आहे. (PM Narendra Modi)

भाजपातील (BJP) सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज जगातील सर्वात जास्त लोकप्रिय नेते आहेत. भारतात सध्या फक्त मोदी-मोदी हा एकच नारा ऐकायला मिळतो आहे. अशात मोदी अशा भागातून मैदानात उतरतील जेथे भाजप कमजोर परिस्थितीत आहे किंवा ज्या भागात भाजपाच्या फार जागा नाहीत आणि जिंकण्याला खूप मोठा वाव आहे. (PM Narendra Modi)

सूत्रानुसार, पंतप्रधान (PM Narendra Modi) सध्या वाराणसी या मतदार संघांचे खासदार आहेत. मात्र २०२४ मधील निवडणूक ते येथून लढणार नाहीत. वाराणसीच नव्हे तर ते उत्तर भारताच्या कोणत्याही मतदार संघातून लढणार नाहीत. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभरातील हिंदू लोकांचे पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) झाले आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारत मोदीमय झाले आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – AFC Asian Cup 2024 : भारताचा उझबेकिस्तानकडून ०-३ असा पराभव)

भाजपचे दक्षिणात्य राज्यावर लक्ष 

आता ज्या भागात कमळ फुलवायचे आहे त्या भागातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरतील. सूत्राचा हा दावा ग्राह्य धरला तर सहज लक्षात येते की भाजपने दक्षिणात्य राज्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पाच राज्ये आणि तीन केंद्र शासित प्रदेशात लोकसभेच्या १३२ जागा आहेत. (PM Narendra Modi)

सूत्रानुसार, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा मतदार संघ ठरला नसला तरी ते केरळच्या तिरुअनंतपुराममधून निवडणूक लढू शकतात. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर केरळचे प्रभारी आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी केरळचे दौरे वाढविले आहेत. यामुळे केरळ हे मोदींचे प्रस्तावित मतदार संघांचे राज्य ठरु शकते. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.