‘रावण’ म्हणून टीका करणा-या खरगेंना पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर, म्हणाले…

107

सध्या गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जस जसा प्रचाराचा रंग चढत चालला आहे तस तसा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना ‘रावण’ असे संबोधित केले, त्यांचा पंतप्रधान मोदी यांनी समाचार घेतला. मी खरगेंचा सन्मान करतो. पण, हे रामभक्तांचे गुजरात आहे, हे काँग्रेसला माहित नाही. रामभक्तांच्या या भूमीवर खरगेंना ‘१०० तोंडाचे रावण’ म्हणण्यास सांगण्यात आले. कारण, काँग्रेसला रामाचे अस्तित्व मान्य नाही. अयोध्येतील राममंदिरावर त्यांचा विश्वास नाही हे आम्हाला माहित आहे. त्यांना राम सेतूचीही समस्या आहे. आता माझ्याबद्दल वाईट बोलण्यासाठी काँग्रेसने रामायणातून रावण आणला आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी खरगेंवर केला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

काँग्रेसने माझ्यावर टीका केल्याचे आश्चर्य वाटत नाही. पण, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करूनही काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना कधीही पश्चाताप आणि दु:ख झाले नाही. पंतप्रधानांबद्दल वाईट बोलणे, हा आपला हक्क आहे, असे काँग्रेसला वाटते. कारण, काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास असता तर ते कधीच या थराला गेले नसते. परंतु, त्यांचा लोकशाहीवर नाहीतर एका कुटुंबावर विश्वास आहे. एका कुटुंबाला खूश करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. मोदींना कोण जास्त वाईट शब्द बोलेल, यासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरु आहे. मात्र, आता त्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे येत्या ५ तारखेला कमळाला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी कलोलमध्ये प्रचार करताना बोलत होते.

(हेही वाचा बैलगाडा शर्यत रद्द, कारण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.