PM Narendra Modi यांची गॅरंटी ; पुढील ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवणार

पंतप्रधान मोदींनी केरळच्या सभेत कॉंग्रेसच्या युवराजवर सडकून टीका, केरळला येत्या ५ वर्षात जागतिक वारसा बनविण्याचे प्रयत्न

58
पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ; पुढील ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवणार !

आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणूक (Lok Sabha Election 2024) प्राचारासाठी सर्वच नेते मंडळींनी प्रचारांचा धूमधडाका लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर दौरे करत आहेत. केरळ येथील पल्लकड  (Kerala Pallakad) येथे पंतप्रधान मोदींची सभा आज झाली. तसेच  पल्लकडला केरळचे प्रवेशद्वार सुद्धा म्हटले जाते. येथील नैसर्गिक सौंदर्य सर्वानाच भुरळ घालते. केरळमध्ये अनेक मंदिर, चर्च आणि श्रद्धास्थळे आहेत. या सर्व स्थळांना येत्या ५ वर्षात जागतिक वारसा बनविण्याचे प्रयत्न करू, तुमचा विश्वास आणि प्रेम पाहून विश्वासाने सांगू इच्छितो की, केरळवासी आपला एक बुलंद आवाज संसदेत पाठवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी भाषणा बोलताना मोदींनी भाजपाच्या संकल्पपत्रातील आश्वासनांचा उल्लेख करत कॉँग्रेस पक्षावर टीका केली. (PM Narendra Modi)

( हेही वाचा – Devendra Fadnavis : काँग्रेसचा जाहीरनाम्याला कागदाच्या तुकड्याची किंमत नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका ) 

पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन 

या सभेत काँग्रेसचे युवराज (Congress Yuvraj) तुमच्याकडून मते मागतील पण केरळ प्रश्नांवर एक शब्दही बोलणार नाही, अशी सडकून टीका पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव न घेता केले. केरळ काँग्रेस डाव्या लोकांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधते. पण दिल्लीत ते एकत्र बसतात, एकत्र जेवतात आणि निवडणुकीची रणनीती बनवतात. एलडीएफ आणि यूडीएफपासून सावध राहा. असे आवाहन ही पंतपाधान मोदी यांनी केरळ मधील जनतेला केले. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Piyush Goyal : भाजपाच्या संकल्प पत्रामधून विकसित, समृद्ध भारताची हमी )

केरळच्या जनतेला गॅरंटीसह आश्वासन 

भाजपा सरकारने (BJP Party) भारताला मजबूत देश बनवले आहे. दरम्यान, एनडीए सरकारने जगभरात भारताची विश्वासार्हता कशी वाढवली, हे केरळच्या जनतेने गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे. काँग्रेस सरकारने भारताची प्रतिमा कमकुवत देश अशी निर्माण केली होती. युद्धात अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्याची ताकद आजच्या भारतामध्ये आहे. केरळमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ३६ लाखांहून अधिक नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. ज्या गतीने जल जीवन, जल मिशन संपूर्ण देशात राबवले गेले आहे, केरळ सरकार तसे होऊ देत नाही, त्यामुळेच आजही केरळमध्ये घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. केरळमधील प्रत्येक घरांत पाणी पोहोचवण्याची गॅरंटी देतो, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले. (PM Narendra Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.