PM Narendra Modi यांनी सांगितले २० वर्षांचे व्हिजन; म्हणाले…

110

मी दीर्घकाळासाठी मुख्यमंत्री राहिलो आहे. वारंवार निवडणुका आणि आचारसंहिता असायच्या तेव्हा आमच्या राज्यातील चांगले अधिकारी दुसऱ्या राज्यात निरिक्षक म्हणून इलेक्शन ड्युटीला जायचे. तेव्हा मला चिंता असायची की, माझे राज्य कसे चालवू? मी तेव्हाही शंभर दिवसांचे प्लानिंग करायचो. मी गेल्या दोन वर्षांपासून २०४७ ला डोक्यात ठेवून काम करतोय. त्यासाठी देशभरातील लोकांच्या सूचना मागवल्या. १५ लाखांहून अधिक लोकांनी याबाबत सूचना पाठवल्या आहेत. येणाऱ्या २५ वर्षांत भारत कसा पाहिजे यावर नागरिकांचे निवेदन घेतले आहे. विविध विद्यापीठ, संस्थांना एकत्रित केले. १५-२० लाख लोकांनी यावर अहवाल दिला. मग एआयच्या मदतीने त्याचे विभाजन केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढील २५ वर्षांसाठी अधिकाऱ्यांची टीम

विभाजनानंतर प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांची टीम पुढील २५ वर्षांसाठी बनवली. अधिकाऱ्यांकडून या कामासाठी मी प्रेझेंटनेश घेतले. प्रत्येक विभागावर दोन-अडीच तास चर्चा केली. मला वाटते की, मी हे काही कागदपत्र बनवतो आहे, हे व्हिजन मोदींची पोपटपंची नाही. १५-२० लाख लोक इन्पुट देत आहे म्हणजे संपूर्ण देशाचा यात समावेश आहे, असेही ते म्हणाले. निवडणूक झाल्यानंतर हा अहवाल राज्यांना पाठवला जाणार. मग राज्यात यासंदर्भात चर्चा होईल. राज्यातून अहवाल आल्यानंतर यावर निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर व्यापक चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल, असे मोदींनी स्पष्ट केले.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : सांगलीत मविआ अडचणीत; काँग्रेसच्या विशाल पाटलांनी भरला अपेक्ष उमेदवारी अर्ज )

पहिल्या शंभर दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेतले

मी तीन विभागात याचे नियोजन केले आहे. २५ वर्षांचे नियोजन, मग पाच वर्षांचे आणि पुढील शंभर दिवसांचे वेळापत्रक बनवून अधिकाऱ्यांना पाठवले आहे. २०१९ मध्येही निवडणुकीत उतरण्याआधी मी अधिकाऱ्यांना १०० दिवासांसाठी कामाला लावले होते. निवडणुका संपल्यानंतर मी पुन्हा कार्यरत झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत मी कलम ३७० हटवला, मग तीन तलाक कायदा रद्द केला, बँकांचे एकत्रितकरण, प्राण्यांचे लसीकण केले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.