PM Narendra Modi यांनी केली ‘सूर्य घर मोफत वीज योजने’ ची घोषणा

या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल.

297
Jallianwala Bagh Massacre: जालियनवाला बाग हत्याकांडातील हुतात्म्यांना पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली श्रद्धांजली; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (१३ फेब्रुवारी) मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत ही घोषणा केली.

(हेही वाचा – Abhishek Ghosalkar Case : जगाला दाखवून देण्यासाठी मॉरिसने फेसबुक लाईव्ह केल्याची शक्यता; अंगरक्षकाला न्यायालयीन कोठडी)

पंतप्रधान म्हणाले की,

शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करीत आहोत. एकूण ७५ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दर महिना ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवत १ कोटी घरांना प्रकाशमान करण्याचे स्वप्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच या योजनेच्या अनुदानापासून जे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल. ते मोठ्या सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, लोकांवर कोणत्याही खर्चाचा बोझा पडणार नाही याची खात्री केंद्र सरकार करणार आहे. योजनेतील संबंधित सर्व भागधारकांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवर एकत्रित केले जाईल, त्यामुळे ही योजना राबवणे अधिक सुकर होणार असल्याचे मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले.

(हेही वाचा – 5-G : युद्धस्थितीत ५-जी मुळे सैन्याची गती वाढणार- डॉ. एल.सी. मंगल)

या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल –

या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल, त्यांचे विजेचे बिल कमी येईल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होवू शकेल. चला सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देऊया. मी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ऑनलाइन अर्ज करत पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना दृढ करण्याचे आवाहन करतो असे पंतप्रधान म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.