PM Modi यांना रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने केले सन्मानित

99
PM Modi यांना रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने केले सन्मानित
PM Modi यांना रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने केले सन्मानित

तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल’ने (Order of St. Andrew the Apostle) सन्मानित करण्यात आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी पंतप्रधान मोदींना हा सन्मान दिला आहे. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारताच्या १४० कोटी जनतेचा सन्मान असल्याचे म्हटले आहे. (PM Modi)

भारत आणि रशिया यांच्यातील भागीदारी आणि मैत्री अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) हा सन्मान देण्यात आला आहे. ‘सेंट अँड्र्यू हे येशूचे पहिले प्रेषित आणि रशियाचे संरक्षक संत मानले जातात. त्यांच्या सन्मानार्थ, हा पुरस्कार पीटर द ग्रेटने 1698 साली सुरू केला. हा सन्मान सर्वात उत्कृष्ट नागरी किंवा लष्करी गुणवत्तेसाठी दिला जातो.

(हेही वाचा – जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला जाणार; Kathua Terror Attack नंतर सरकारचा इशारा)

ग्रँड हॉल ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूमध्ये आयोजित एका भव्य समारंभात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना हा सन्मान दिला. हा हॉल शतकानुशतके रशियामध्ये केवळ विशेष कार्यांसाठी वापरला जात आहे. पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, त्यांना हा सन्मान देताना मला खूप आनंद होत आहे.  (PM Modi)

(हेही वाचा – Jayant Patil यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप; म्हणाले…)

सत्कारानंतर काय म्हणाले पीएम मोदी? 

रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित झाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘रशियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. हा केवळ माझाच नव्हे तर १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. गेल्या अडीच दशकांपासून तुमच्या नेतृत्वाखाली भारत आणि रशियाचे संबंध (India Russia Relations) प्रत्येक दिशेने मजबूत झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नवीन उंची गाठत आहेत. तुम्ही दोन्ही देशांमधले धोरणात्मक संबंध काळाच्या ओघात दृढ होत गेले आहेत.

(हेही वाचा – ITR Filing : ‘या’ २८ बँकांमध्ये भरू शकता आयकर, जाणून घ्या बँकांची यादी)

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आमचे संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जागतिक स्थैर्य आणि शांतता यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे आमचे दोघांचे मत आहे. आगामी काळातही आम्ही या दिशेने काम करत राहू. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  (PM Modi)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.